Saam TV News
किटकांचा नाश करण्यासाठी साफसफाई करताना जेल तंत्रज्ञानावरील झुरळनाशकांचा समावेश करावा. झुरळांचा नायनाट करण्यामागील खालील सात महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या.
सर्रास नजरेस पडणारे झुरळ कपाटाचे कोपरे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांमागील जागा, सिंकच्या खाली असलेली जागा, ड्रेनेज, पाईपच्या जोडणीमधील फटी यांमध्ये झुरळे लपून बसतात.
झुरळांमुळे जंतू अन्नपदार्थांवर पसरतात आणि त्यांच्या विष्ठेमुळे दमा असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. लहान मुले वारंवार वस्तूंना स्पर्श करत असल्याने त्यांच्यासाठी हा प्रादुर्भाव अधिक धोकादायक ठरतो.
सणासुदीला घरात किराणा सामान आणि फराळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर आल्याने उघडे डबे, सांडलेले गोड पदार्थ आणि वाढलेला कचरा यांमुळे झुरळांचा वावर झपाट्याने वाढतो.
झुरळांच्या समस्येवर जेलयुक्त झुरळनाशक हा एक रामबाण उपाय आहे. हे जेल कपाटांचे कोपरे आणि सिंकखालील अंधाऱ्या जागांवर लावावे, जेणेकरून झुरळे ते खाऊन नष्ट होतात.
दिवाळीच्या धावपळीत झुरळांचा उपद्रव नको असेल, तर झुरळनाशक जेल हा एक अत्यंत सोयीस्कर आणि जालीम उपाय आहे.
सणासुदीच्या धावपळीत स्वयंपाकघरातील झुरळांचा बंदोबस्त करण्यासाठी जेलयुक्त फवारणी अत्यंत सोयीची ठरते. हे जेल झुरळांच्या लपण्याच्या जागी सहज लावता येते आणि एकदा लावल्यानंतर महिनाभर प्रभावी राहते. त्यामुळे वारंवार फवारणी मारण्याचा त्रास टळतो आणि घर स्वच्छ राहते.
सणासुदीच्या साफसफाईदरम्यान कपाटे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे हलवताना मोठ्या संख्येने झुरळे बाहेर पडतात. दिवाळीची लगबग सुरू होण्यापूर्वी जेलयुक्त झुरळनाशक वापरल्यास या कीटकांपासून कायमचा बचाव होतो आणि अन्न साठवणुकीच्या जागा स्वच्छ राहतात.
NEXT : प्रत्येक महिलेवर खुलून दिसतील साडीचे हे ७ सुंदर रंग; साडी खरेदी करताना लक्षात ठेवा