Shruti Vilas Kadam
काळ्या रंगाची साडी जवळपास प्रत्येक महिलेला स्टायलिश आणि एलिगंट लूक देते. पार्टी, लग्नसमारंभ किंवा खास कार्यक्रमासाठी काळ्या रंगाची साडी उत्तम पर्याय ठरू शकते.
लाल रंगाची साडी पारंपरिक आणि आकर्षक लूकसाठी लोकप्रिय आहे. लग्न, सण किंवा पूजेसाठी हा रंग विशेष पसंत केला जातो.
रॉयल ब्लू रंगाची साडी उठावदार आणि क्लासी दिसते. दिवसा किंवा रात्रीच्या कार्यक्रमासाठी हा रंग निवडता येतो.
एमराल्ड ग्रीन म्हणजेच पाचूसारखा हिरवा रंग साडीला रॉयल लूक देतो. सण, लग्न आणि रिसेप्शनसाठी हा रंग आकर्षक पर्याय आहे.
गुलाबी रंगाची साडी नाजूक, सुंदर आणि फ्रेश लूक देते. हलका गुलाबी रंग साध्या कार्यक्रमांसाठी, तर गडद गुलाबी रंग लग्नसमारंभासाठी निवडता येतो.
मरून रंगाची साडी पारंपरिक आणि रॉयल लूकसाठी उत्तम आहे. विशेषतः सिल्क, बनारसी किंवा भरजरी मरून साडी सण आणि लग्नासाठी सुंदर दिसते.
पांढरी किंवा ऑफ-व्हाइट साडी साधी, मोहक आणि एलिगंट दिसते. त्यावर रंगीत बॉर्डर, भरजरी वर्क किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाउज छान दिसतो.