Organ Donation Saam Tv
लाईफस्टाईल

Organ Donation : त्याने घेतला जगाचा निरोप, कुटुंबावर दु:खाचा डोंगर; पण अनेकांना दिलं जीवनदान...

DPU Super Specialty Hospital : कुटुंबातील एकुलता एक कमावणारा असून त्यामागे, आता त्याचे आई-वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे.

कोमल दामुद्रे

Pune : ब्रेन डेड घोषित केलेल्या पुण्यातील एका ३२ वर्षीय तरुणाने मृत्यूनंतर देखील अवयवदान करून ५ जणांचे प्राण वाचवले आहेत. हा तरुण हायड्रोसेफलससह इंट्राव्हेंट्रिक्युलर हॅमरेजसह एन्युरिझमल इंट्राक्रॅनियल रक्तस्रावाने त्रस्त होता. कुटुंबातील एकुलता एक कमावणारा असून त्यामागे, आता त्याचे आई-वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे.

१७ मे रोजी संध्याकाळी ३२ वर्षीय तरुणाच्या आवश्यक चाचण्या केल्यानंतर त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. हा रुग्ण गेल्या तीन महिन्यांपासून त्रस्त होता आणि त्याच्यावर आरोग्य (Health) केंद्रात उपचार सुरू होते.

प्रत्यारोपण समन्वयकाने रुग्णाच्या कुटुंबीयांचे (Family) समुपदेशन केले आणि नंतर त्यांनी आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. १८ मे रोजी, नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन (NOTTO) ने डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे येथे अवयव दान (Donate) प्रणालीनुसार दात्याच्या अवयवांच्या उपलब्धतेबद्दल अलर्ट जारी केला, त्यानुसार हृदय, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड आणि मूत्रपिंड शुक्रवारी पुनर्प्राप्त करण्यात आले.

१९ मे रोजी पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णांना फुफ्फुस आणि १ किडनी देण्यात आली, हृदय मुंबईतील सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आले आणि १ मूत्रपिंड, यकृत आणि स्वादुपिंड पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दिले गेले.पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील म्हणाले रुग्ण ब्रेन डेड झाला होता

आम्ही तिच्या अवयवदानाबद्दल कुटुंबाकडून संमती मिळवू शकलो. बहु-अवयव प्रत्यारोपण आमच्या सर्जनच्या हस्ते यशस्वीपणे करण्यात आले. हृदयाची निर्धारित वेळेत मुंबईत पोहोचण्यासाठी अत्यंत गरजेची होती, त्यासाठी आम्ही डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते मुंबई असा ग्रीन कॉरिडॉर मोठ्या कार्यक्षमतेने तयार केला. हृदय मुंबईत अवघ्या १.५ तासात पोहोचले, त्यांच्या या उदात्त कृतीबद्दल आम्ही कुटुंबाचे आभारी आहोत आणि याद्वारे आम्ही अनेक जीव वाचवू शकलो याचा आनंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Maharashtra politics : प्रचारापासून मला रोखण्याचा प्रयत्न, वारीस पठाण ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT