Habit Of Smoking Saam Tv
लाईफस्टाईल

Habit Of Smoking : मुझे तो तेरी लत लग गई... टेन्शन आल्यावर तुम्हालाही स्मोकिंग करण्याची सवय आहे? या टिप्स फॉलो करा

Smoking Habits : घरामध्ये कोणत्याही गोष्टीवरून बाचाबाची झाली की, सर्वात आधी सिगारेटची आठवण येत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Rid Of These Habits : घरामध्ये कोणत्याही गोष्टीवरून बाचाबाची झाली की, सर्वात आधी सिगारेटची आठवण येत. सोबतच ऑफीसमध्ये कामाचं प्रेशर वाढल्यानंतर अनेक व्यक्ती असा विचार करतात की, आता आपण जरा सिगारेट ओढू.

तुमच्यासोबत सुध्दा असं होत असेल तर, त्यात काही जगावेगळ नाही. अनेक व्यक्तींना स्ट्रेस (Stress) म्यानेज करण्यासाठी किंवा स्ट्रेस बाहेर काढण्यासाठी सिगारेट स्मोकिंग हा एक चांगला मार्ग वाटतो.

परंतू सिगारेट ओढल्याने रिलॅक्स वाटतं असेल तरी, तुमच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. तूमचे हार्ट रेट वाढू लागतात. अशातच जास्त प्रमाणात सिगारेटच सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात.

तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस झाला तर, सिगारेट न पिता त्यावर कोणता उपाय काम करेल याचा विचार करा. सिगारेट पिणाऱ्या व्यक्तींसाठी हे सोपे काम नाही आहे. परंतु अशक्य देखील काही नाही आहे. स्वतःमध्ये काही नवीन बदल घडवून आणणे नवीन सवयी लावून तुम्ही सिगारेट ओढणे थांबवू शकता.

दीर्घ श्वास घ्या -

दररोज सकाळी उठल्यानंतर दीर्घ श्वास घेण्याची सवय लावा. कमीत कमी तीन वेळा नाका मधून दीर्घ श्वास घ्या. प्रत्येक वेळी श्वास हळूहळू आतमध्ये घ्या आणि तोंडामधून सोडा. दीर्घ श्वासाची ही सवय मेंदूच्या विकासासाठी अत्यंत फायदेशीर (Benefits) असते. ज्यामुळे स्ट्रेस झेलण्याची सहनशक्ती वाढते.

भरपूर झोप घ्या -

सुरुवातीला सिगारेट सोडण्याचा परिणाम डोक्यावरती होतो. त्यामुळे डोकं शांत ठेवण्यासाठी भरपूर झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला स्ट्रेस आणि स्मोकिंग पासून सुटकारा मिळवायचा असेल तर, तुम्ही सात ते आठ तास चांगली झोप घेतली पाहिजे.

योग्य डायट योग्य एक्सरसाइज -

योग्य डायट आणि योग्य एक्सरसाइज केल्याने तुमची स्मोकिंगची सवय सुटू शकते. तुमच्या शरीरामध्ये जेवढे टॉक्सिन्स असतील तेवढा तुम्हाला जास्त स्ट्रेस होईल. अशातच सिगारेटचे सेवन केल्याने टॉक्सिन कधीच कमी होत नाही.

त्यामुळे या सगळ्या सवयींना तुम्ही बॅलन्स सोबत बदला. सोबतच एक्सरसाइज करा. जेणेकरून तुम्हाला घाम येऊन शरीराचे सगळे टॉक्सिन्स बाहेर निघून जातील. सोबतच तुम्ही भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन देखील केले पाहिजे.

सोबतच कॉफीचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. चहा कॉफी या पदार्थांमध्ये कैफिन असते. कॅफिन तुमच्या शरीरामधील स्ट्रेस वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कॉफी पिणे सोडून द्या.

लोकांसोबत बसणे उठणे करा -

स्ट्रेस आणि स्मोकिंगमुळे अनेक व्यक्ती एकलकोंडे होऊन जातात. परंतु ही सवय अत्यंत वाईट आहे. असं करणे तुमच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत चुकीचे आहे. अशातच तुम्ही लोकांपासून दूर राहण्याऐवजी त्यांच्याशी बोलणे चालणे आणि भेटणे वाढवा.

तुमच्या फ्रेंडसोबत, फॅमिली मेंबरसोबत आणि ऑफिस मधील सहकाऱ्यांसोबत मन भरून बोला. परंतु तुम्हाला त्या व्यक्तींपासून दूर राहायचे आहे ज्या व्यक्ती तुम्हाला स्मोकिंग करण्यासाठी प्रोत्साहित करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT