Relationship Tips
Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : बरेच पुरुष गर्लफ्रेंड किंवा पत्नीशी 'या' आठ गोष्टींबाबत खोटं सांगतात, तुमच्यासोबत 'असं' काही घडतंय का?

कोमल दामुद्रे

Relationship Tips : दिवसभरात आपण कोणाना कोणाशी खोटे बोलतच असतो. खोट बोलणे हा मानवी स्वभाव आहे. हल्ली लहान मुले आपल्याशी सहज खोटे बोलताना दिसतात. पण खोटे बोलणे हे कोणत्या तरी मोठ्या प्रसंगातून बाहेर निघण्याचा उत्तर आहे. असे प्रत्येकाला वाटते.

काही वेळेस आपल्या गोष्टी लपवण्यासाठी काही वेळेस खोट बोलतात. त्यातील काही व्यक्ती तर अशा आहेत ते काही कारण नसताना देखील खोटे बोलतात. ज्यामुळे त्याचा परिणाम हा आपल्या नात्यावर होऊ लागतो. यामुळे आपल्या नात्यात दूरावा निर्माण होतो. तसेच आपल्या जोडीदाराला याचा राग देखील येतो. काही वेळेस आपण आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी देखील खोटे बोलतो. त्यासाठी जाणून घेऊया असे कोणते सामान्य पध्दतीने खोटे बोलणाऱ्या गोष्टी आहेत जे पुरुषवर्ग स्त्रियांशी किंवा आपल्या गर्लफ्रेंडशी बोलतात.

१. असे पाहिले जाते किंवा होताना दिसते की, एखादा पुरुष हा रिलेशनशिपमध्ये असून देखील तो दुसऱ्या स्त्रीकडे खेचला जातो. काही कारणास्तव तिने किंवा त्याने विचारल्यानंतर तो खोटे बोलतो की मी सिंगल आहे. असे खोटे बोलून समोरच्या महिलेने त्यांच्याशी बोलणे बंद करू नये, अशी पुरुषांची इच्छा असते.

२. अशी अनेक प्रकरणे समोर येत असतात ज्यात पुरुष आपल्या महिला जोडीदारासोबत बसलेले असतात. ज्यात काही वेळेस समोरुन दुसरी महिला जाते व पुरुष तिथे आकर्षित होतात, जेव्हा जोडीदार त्यांना हे करण्यासाठी अडवतो तेव्हा अनेकदा पुरुष ही गोष्ट टाळतात किंवा खोटे बोलतात की आपण त्या स्त्रीला पाहत नाही पण अचानकपणे त्यांच्या मनात इतर भावना निर्माण होतात.

३. रिलेशनशिपमध्ये (Relationship) स्त्रियांना स्मोकिंग करणारा जोडीदार आवडत नाही व त्या गोष्टींवर सतत टोकत असतात. अशावेळी आपला जोडीदार स्मोकिंग केल्यानंतर काही पदार्थ खाऊन आपल्याला भेटतो किंवा त्याचा वास जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो. तेव्हा समजावे तो नक्कीच आपल्याशी खोट बोलतोय.

४. जोडीदाराचे मन जिंकण्यासाठी आणि त्याला दुःखी न करण्यासाठी अनेक वेळा पुरुष खोटे बोलतात की मी फक्त तुझ्याबद्दलच विचार करत असतो.

५. आपण नेहमी चित्रपटात (Movie) पहात असतो की, बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड फोनवर बोलताना एकमेकांना आठवत असतात. परंतु, फोन ठेवल्यानंतर पार्टी सुरू होते नाहीतर पार्टीची योजना सुरू करतात. पुरुष अनेकदा असे खोटे बोलून जोडीदाराचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात.

६. लग्नाच्या आधी मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुले नेहमी खोटे बोलतात की, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. त्याच वेळी, विवाहित पुरुष अनेकदा पैसे असूनही पैसे नसल्याबद्दल त्यांच्या पत्नीशी खोटे बोलतात.

७. कोणत्याही मुलीचे मन जिंकण्यासाठी पुरुष अनेकदा खोटे बोलतात की लग्नाआधी ते अजिबात जवळीक करणार नाहीत. पण मुलगी हो म्हणताच, ते त्या गोष्टीसाठी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात.

८. पुरुष आपल्या गर्लफ्रेंड किंवा पत्नीशी नेहमी खोट बोलतो की, तो एकदाच प्रेमात पडला आणि तोही आपल्यासोबतच. अनेक वेळा मुलं त्यांच्या पूर्वीच्या गर्लफ्रेंडबद्दलही सांगत नाहीत कारण त्यांमुळे आपल्याला त्याच्याविषयी राग येऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

SCROLL FOR NEXT