Relationship tips : परफेक्ट लाईफ पार्टनर शोधताय ? किंवा तो शोधण्याचा कंटाळा आलाय तर या टिप्स फॉलो करा

जोडीदाराची निवड करताना काय काळजी घ्याल ?
Relationship tips, perfect partner, tips
Relationship tips, perfect partner, tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की, परिपूर्ण जीवनसाथी आपल्याला मिळायला हवा. जीवनसाथीची निवड करताना आपण अनेकदा आपल्या तत्वात बसणाऱ्याच्या शोधात असतो.

हे देखील पहा -

आपण नेहमी जीवनसाथी निवड असताना त्याच्यामध्ये काही तरी खास शोधण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला आयुष्यात जोडीदाराची गरज असते. काही लोक स्वतःसाठी उत्तम जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत जरी असले तरी आपल्या काही चुकांमुळे आपल्याला नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते जाणून घेऊया जोडीदार निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्याला हवी.

१. आपल्या जोडीदाराला आपल्याबद्दल आदर नसेल तर आपले एकमेकांवर कितीही प्रेम असले तरी ते नाते तुटले जाऊ शकते. याचे कारण असे की जेव्हा जोडीदार आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही किंवा आपल्याला शिवीगाळ करतो तेव्हा आपल्याला त्याचा पश्चाताप करण्याची वेळ (Time)येते.

Relationship tips, perfect partner, tips
Health tips : रक्त विकाराचा आजार कशामुळे होतो ? अशक्तपणामुळे की, आणखी कोणत्या समस्येमुळे जाणून घ्या

२. अनेकांना न बोलता किंवा अगदी क्षुल्लक गोष्टीवरही आपल्याला खूप राग येतो, जे कोणत्याही नात्यासाठी चांगले नसते. जर आपण असा जोडीदार निवडत असाल ज्याला प्रत्येक गोष्टीवर राग येतो, तर आपल्याला इच्छा असूनही आपला मुद्दा समजावून सांगता येत नाही. राग प्रत्येक व्यक्तीला येतो, पण आक्रमक स्वभावाचा जोडीदार नेहमी चिडचिड करणारा राहतो. अशा जोडीदारासोबत आयुष्य जगणे खूप कठीण असते.

३. आपल्या नात्यात (Relation) जितके प्रेम महत्त्वाचे आहे तितकेच त्याच्यात अंतर असणे देखील महत्त्वाचे आहे. आपल्याला काही बाबतीत स्वतंत्रपणे राहण्याची आवड असते अशा ठिकाणी आपल्या जोडीदाराने समजून न घेतल्यास किंवा आपल्याला हवे तसे जगू न दिल्यास आपल्याला गुदमरल्यासारखे वाटू लागते. लग्नाला होकार देण्यापूर्वी आपला पार्टनर आपल्याला स्पेस देतो का हे तपासून पहा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com