Morning or Evening Blood Pressure Rise the Most AI Image
लाईफस्टाईल

Blood Pressure : सकाळ की संध्याकाळ? ब्लड प्रेशर नेमका कधी वाढतो? शरीरातच लपलंय हे चक्र, माहिती असायला हवं

Blood Pressure Heart Health : सकाळी उठल्यानंतर ब्लड प्रेशर का वाढते? रात्री झोपताना रक्तदाब कमी होतो का? जाणून घ्या दिवसभरातील रक्तदाबातील चढ-उतार, त्यामागील कारणे आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या आरोग्यदायी टिप्स.

Alisha Khedekar

ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब दिवसभर एकसारखा राहत नाही. आपल्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रियेनुसार त्यात बदल होत असतात. विशेष म्हणजे, सकाळी झोपेतून उठल्यानंतर रक्तदाब वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे सकाळची वेळ आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते.

रात्री झोपताना शरीराला विश्रांती मिळते. यावेळी साधारणपणे रक्तदाब कमी असतो. मात्र, सकाळी जाग आल्यानंतर शरीर सक्रिय होऊ लागते. हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीरात काही हार्मोन्सची निर्मिती होते. यामुळे रक्तदाबात वाढ होऊ शकते. सकाळी उठल्यानंतर काही तासांत रक्तदाब तुलनेने जास्त असू शकतो.

दिवसभर काम, धावपळ, मानसिक ताण आणि शारीरिक हालचालींमुळे रक्तदाबात चढ-उतार होतात. संध्याकाळी काही लोकांचा रक्तदाब पुन्हा वाढू शकतो. मात्र, रात्री शांत झोपेत असताना साधारणपणे रक्तदाब कमी होतो. निरोगी व्यक्तींमध्ये झोपेच्या वेळी रक्तदाबात घट दिसून येते.

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. नियमित चालणे किंवा व्यायाम करणे, मिठाचे प्रमाण कमी ठेवणे, पुरेशी झोप घेणे, ताण कमी करणे आणि संतुलित आहार घेणे फायदेशीर ठरते. तसेच, रक्तदाब मोजताना योग्य पद्धतीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या दिवशी रक्तदाब मोजून त्याची नोंद ठेवल्यास त्यातील बदल समजण्यास मदत होते. लक्षात ठेवा, रक्तदाब वाढण्याची वेळ प्रत्येक व्यक्तीत वेगळी असू शकते. त्यामुळे केवळ सकाळी किंवा संध्याकाळी रक्तदाब मोजून निष्कर्ष काढू नका. नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच निरोगी हृदयासाठी महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : कामापुरता मामा म्हणणाऱ्या ५ प्रकारच्या लोकांपासून राहा सावध! चाणक्यांनी सांगितली ओळख

Maharashtra News Live Update: पुण्यात मेट्रो ऐन प्रवासात बंद! प्रवाशांना थेट मेट्रो पुलावर उतरवले; पाहा नेमकं काय घडलं?

Kaaliya Movie: कार्तिक आर्यनचा वाढदिवशी चाहत्यांना मोठ सरप्राईज! 'कालिया'चा थरारक टीझर रिलीज, श्रीकृष्ण कथेतून उलगडणार रहस्य

Alcohol Effects : दारू प्यायल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येते? ही ७ कारणे जाणून घेतल्यावर व्हाल थक्क!

राज्यभर दुष्काळ, पण कोकणातील या तळीत पाण्याचा महापूर! रहस्य काय?

SCROLL FOR NEXT