Morning Drink Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Drink : सकाळी रिकाम्या पोटी 'हे' ड्रिंक्स प्या, आरोग्याला होतील असंख्य फायदे !

लोक त्यांच्या सकाळची सुरुवात हेल्दी ड्रिंकने करतात. त्यामुळे आरोग्यालाही खूप फायदा होतो.

कोमल दामुद्रे

Morning Drink : दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. म्हणूनच लोक त्यांच्या सकाळची सुरुवात हेल्दी ड्रिंकने करतात. त्यामुळे आरोग्यालाही (Health) खूप फायदा होतो.

शरीराच्या अनेक समस्यांवरील उपाय हे स्वयंपाकघरातील मसाले आणि औषधी वनस्पतींमध्ये आहेत. असे मानले जाते की, सकाळी या मसाले (Spices) आणि औषधी वनस्पतींपासून बनवलेले पाणी सेवन केल्यास शारीरिक समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी काय प्यावे. (Latest Marathi News)

Fenugreek water

मेथीचे पाणी - पोटॅशियम, झिंक, जीवनसत्त्व क आणि ब, सोडियम, फायबर आणि कॅल्शियम इत्यादी मेथीच्या पाण्यात आढळतात. यामुळे व्यक्तीला अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार होत नाही. त्यासाठी सकाळी याचे सेवन करावे.

Cumin Seeds

जिऱ्याचे पाणी - कॅल्शियम, सेलेनियम आणि मॅग्नेशियम इत्यादी गुणधर्म जिऱ्याच्या पाण्यात आढळतात. जिऱ्याच्या पाण्यात जीवनसत्त्व ई आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जिऱ्याचे पाणी फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने पोटातील गॅसपासून सुटका होते.

Ajwain Water

ओव्याचे पाणी - वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ओव्याचे पाणी सकाळी पिणे फायदेशीर आहे. डोकेदुखी, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पोटाच्या समस्यांसाठीही ओव्याचे पाणी सेवन केले जाऊ शकते.

Chia Seeds Water

सबज्याचे पाणी - सबज्याच्या बियांमध्ये कॅल्शियम, फायबर, प्रथिने, लोह, फॉस्फरस, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, ओमेगा 6 फॅटी अॅसिड आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. याचे पाणी सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते आणि अँटीऑक्सिडंटची कमतरता दूर होते.

Cinnamon Water

दालचिनीचे पाणी - शरीरातील वेदना दूर करण्यासाठी दालचिनीच्या पाण्याचे सेवन हा एक चांगला पर्याय आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स असतात. दालचिनीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. सूज आणि शरीरातील वेदना कमी करण्यासाठी हे दररोज सेवन केले जाऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Live News Update : पनवेलजवळ मालगाडी रुळावरून घसरली; रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत

कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

राज्यातील सर्व शाळा उद्या बंद; पुण्यात उद्या शिक्षक शिक्षकेतर संघटनेचा एल्गार

SCROLL FOR NEXT