Natural remedies for morning stomach bloating SAAM TV
लाईफस्टाईल

Morning Bloating: सकाळी उठल्यावर पोटफुगीचा त्रास होतोय; हे किचनमधील पदार्थ करतील तुमची मदत

Natural remedies for morning stomach bloating: सकाळी उठल्यावर पोट फुगणं, गॅस आणि जडपणा याचा त्रास होतो? लिंबू, आलं, बडीशेप आणि ग्रीन टीसारखे नैसर्गिक उपाय पचन सुधारू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

सकाळी उठल्यावर फ्रेश वाटलं की पुढचा संपूर्ण दिवस चांगला जातो असं मानलं जातं. मात्र अनेकांना सकाळी उठल्यावर पोट फुगणं म्हणजेच पोटात जड वाटणं, गॅस तयार होणं किंवा पोटात थोडासा दाब येणं या अशा समस्यांचा सामना करावा लागतो. सकाळी असा त्रास झाल्याने त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावर होत असतो.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, रात्री उशिरा किंवा जास्त मसालेदार अन्न खाणं, झोपेची कमतरता, पुरेसं पाणी न पिणं आणि शरीरात जळजळ वाढवणारे पदार्थ खाणं ही यामागील कारणं आहेत.

नैसर्गिक उपाय

आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोघांचाही असा विश्वास आहे की, ज्यावेळी पचनसंस्था योग्यरित्या काम करत नाही किंवा शरीरात टॉक्सिन पदार्थ जमा होतात तेव्हा ही लक्षणं उद्भवतात. सकाळी रिकाम्या पोटी काही नैसर्गिक घटकांचं सेवन केल्याने पोटातील सूज कमी होण्यास मदत होते.

लिंबू

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामुळे पाचक रस एक्टिव्ह होऊन अन्न पचन होण्यास मदत होते. लिंबू कोमट पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास ते गॅस बाहेर काढण्यास, चयापचय वाढण्यास आणि पोटफुगी कमी करण्यास मदत होते.

आलं

आयुर्वेदात आल्याला शरीरातील टॉक्सिन घटक दूर करणारं औषध मानलं जातं. त्यात जिंजेरॉल नावाचं एक घटक असतो. ज्यामुळे तुमची जळजळ कमी होण्यास मदत होते.

बडीशेप

भारतीय घरांमध्ये बडीशेपचा वापर वर्षानुवर्षे केला जातो. बडीशेपमध्ये अॅनेथोल असतं जे गॅस तयार होण्यास रोखतं करते आणि पोटात आधीच साचलेला वायू बाहेर पडण्यास मदत होते. आयुर्वेदात म्हटलंय की, बडीशेप वात दोष शांत करते, जो गॅस आणि पोटफुगीचे प्रमुख कारण आहे.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचं अँटीऑक्सिडंट्स असतं. जे शरीराला केवळ फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जळजळीचा त्रास होत नाही. ग्रीन टी पचन प्रक्रिया सुधारते आणि यकृताला टॉक्सिन फ्री करण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने टॉक्सिन पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरी तुमरी

भाजपचा वटवृक्ष कार्यकर्त्यांच्या संघर्षातून उभा राहिलाय; रविंद्र चव्हाणांनी सांगितला पक्षाचा इतिहास

Nanded Crime: सोनू कल्याणकरच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट; हत्येमागील धक्कादायक कारण आलं समोर

PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच लक्ष्मण हाकेंच्या माघारीनंतरही नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT