Protein Deficiency Saam Tv
लाईफस्टाईल

Protein Deficiency : 80 टक्क्यांपेक्षा अधिक भारतीयांमध्ये प्रोटीनची कमतरता, संशोधनातून आले समोर

Is protein good for losing weight : हाय प्रोटीन पदार्थ खाल्ल्याने खरच वजन कमी होते ?

कोमल दामुद्रे

Protein Rich Foods : अनियमित जीवनशैली, व्यस्त वेळापत्रक, जास्त वेळ स्क्रीन टाइम आणि झोपेची काम करतात यामुळे अनेकांना थकवा जाणवतो. आपण दिवसभरात खाणाऱ्या पदार्थांमुळे आपल्या हवे तितके प्रथिने त्यातून मिळते का ?

एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की, तब्बल 91% शाकाहारी (Vegetarian) आणि 85% मांसाहारी लोकांमध्ये प्रथिनांची कमतरता असल्याचे 'प्रोटीन कंझम्पशन इन द डायट ऑफ अॅडल्ट इंडियन्स सर्व्हे' (प्रॉडिजी) या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सर्वेक्षणात 30 ते 55 वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया (Women), सामाजिक-आर्थिक वर्ग A आणि B मधील, 59% मांसाहारी आणि 41% शाकाहारी लोकांचा समावेश आहे. एखाद्या प्रौढ व्यक्तीला किमान त्याच्या वजनाच्या 1 ग्रॅम प्रति किलो प्रोटीनची आवश्यकता असते.

प्रथिनांच्या कमतरतेच्या मुख्य लक्षणांपैकी (Symptoms) एक म्हणजे अशक्तपणा आणि थकवा. जर आपण आपल्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवले ​​तर आजार, पोटातील चरबी, मधुमेह व उच्च ट्रायग्लिसराइड पातळी यावरही लक्ष देता येऊ शकते, असे कुंबाला हिल हॉस्पिटलच्या सल्लागार पोषणतज्ज्ञ नीति देसाई यांनी सांगितले.

पश्चिम झोनमध्ये, 73% लोकांना प्रथिनांविषयी अधिक माहीती नव्हती तर उत्तर झोनच्या तुलनेत, जेथे 98% लोकांना याची माहिती नव्हती. असे डॉक्टरांनी सांगितले. या सर्वेक्षणात प्रथिने आणि त्याच्याबद्दल असणाऱ्या गैरसमजावर भर टाकण्यात आला. यात 80% पेक्षा जास्त लोकांना प्रथिनांशी संबंधित आरोग्य फायद्यांबद्दल माहिती होती, जसे की स्नायू मजबूत करणे, प्रतिकारशक्ती निर्माण करणे, थकवा दूर करणे आणि निरोगी नखे आणि केसांची वाढ

तर 85% लोकांचे असे मत होते की, त्यांच्या दैनंदिन प्रथिनांच्या गरजांसाठी नियमित आहार पुरेसा आहे आणि जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्याने वजन वाढते. लोक रोजच्या आहारातील प्रथिनांचे महत्त्व समजून घेण्यात आज अपयशी आहेत. प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी केवळ बॉडी बिल्डर्स, कुपोषित किंवा खूप आजारी असणारे लोक यावर विचार करतात. परंतु, आपल्या आता आहारात प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करण्याची वेळ आली आहे,

1. तुम्हाला प्रथिनांबद्दल हे माहीत आहे का ?

  • प्रथिनांच्या गरजेसाठी नियमित आहार पुरेसा आहे

  • फक्त व्यायाम/जिम करणार्‍या लोकांसाठी महत्वाचे

  • जास्त प्रथिने घेतल्याने वजन वाढते

2. शरीराला प्रथिनांची गरज आहे का ?

  • प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आवश्यक

  • गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिला, वाढणारी मुले आणि वृद्धांसाठी महत्वाचे

  • स्नायू तयार करण्यास आणि पुनर्प्राप्तीस गती देण्यास मदत करते

3. प्रथिनांचे मुख्य स्त्रोत कोणते ?

80% पेक्षा जास्त लोकांना प्रथिनांशी संबंधित आरोग्य फायद्यांविषयी माहिती होती. जसे की स्नायू मजबूत करणे, प्रतिकारशक्ती निर्माण करणे, थकवा दूर करणे आणि निरोगी नखे आणि केसांची वाढ

4. यातून मिळू शकते प्रथिने

  • दूध

  • हिरव्या पालेभाज्या

  • डाळी आणि शेंगा

  • अंडी

  • चिकन

  • मासे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT