Chandra Grahan Saam Tv
लाईफस्टाईल

Chandra Grahan 2023 : वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण कधी? भारतात दिसणार का? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Moon Eclipse 2023 :

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे आश्विन महिन्यातील पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेला आहे. यंदा हे चंद्रग्रहण २८ ऑक्टोबरला असणार आहे. हे ग्रहण वैज्ञानिक आणि धार्मिकतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे मानले जाते.

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येतो तेव्हा चंद्रग्रहण तयार होते. धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी राहू चंद्राच्या जवळ आल्यामुळे अनेक राशींना याचा त्रास सहन करावा लागतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. चंद्रग्रहण कधी आहे?

कोजागरी पौर्णिमेला (Kojagiri Purnima) शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. याशिवाय हे ग्रहण अटलांटिक महासागर, हिंद महासागर, पश्चिम आणि दक्षिण पॅसिफिक महासागर, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिकेच्या पूर्व उत्तर भागातही दिसणार आहे. हे ग्रहण अश्विनी नक्षत्र आणि मेष राशीमध्ये (Zodic) प्रवेश करणार आहे.

2. भारतात चंद्रग्रहण किती वाजता दिसणार ?

भारतीय वेळेनुसार, चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2.24 वाजता संपेल. भारतात (India) ग्रहण कालावधी चार तास चोवीस मिनिटे असेल.

3. चंद्रग्रहण कोठे दिसेल?

चंद्रास्ताच्या वेळी ग्रहणाची सुरुवात ऑस्ट्रेलिया, उत्तर पॅसिफिक महासागर आणि रशियाच्या पूर्व भागात दिसेल. चंद्रोदयाच्या वेळी, ग्रहणाचा शेवट ब्राझील आणि कॅनडाच्या पूर्व भागात आणि उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागरात दिसेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Insurance: क्या बात, क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या

Nanded Bypoll : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; नाना पटोले यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Updates: बदलापुरात महानगर गॅसची मुख्य पाईपलाईन फुटली

New Justice Statue In SC: आता न्यायदेवता डोळस होणार! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीची पहिली लढत ठरली; दोन्ही राष्ट्रवादींमध्ये होणार थेट सामना?

SCROLL FOR NEXT