Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips: पावसाळ्यात पोटाचे आजार कसे टाळायचे? तज्ञांकडून घ्या जाणून

Monsoon Health Care: सध्या पोटाच्या समस्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मात्र आता पावसाळा सुरु झाल्यानंतर पोटदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्रासह सर्व ठिकाणी पावसाचे जोरदार आगमन झालेले आहे. पावसाळा जसा आनंदाच्या सरी घेऊन येतो त्यासोबत अनेक आरोग्याच्या समस्याही निर्माण करतो. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात अनेक पोटासंबंधित आजार होऊ शकतात. तज्ज्ञांचे मते पावसाळ्याच्या या दिवसात संसर्ग निर्माण करणारे अनेक बॅक्टेरिया मोठ्या वेगाने पसरतात. त्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो.

पावसाळ्यात व्यक्तींचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढताना दिसून येते. ताप ( fever)येण्यापासून ते पोटदुखीच्या समस्या जाणवत असलेल्या दिसतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अन्नपदार्थ खाताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला वेळोवेळी डॉक्टर देत असतात. पावसाळ्यात पोटासंबंधित समस्या होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ते खाली दिलेल्या प्रमाणे पाहूयात.

बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नये

पावसाळा सुरु होताच अनेकांना बाहेरचे चटाकेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. जेव्हा बाहेरुन आपण पदार्थ विकत घेतो त्यावेळी ते जास्त वेळ उघडे असते. अशा पदार्थावर बॅक्टेरिया (Bacteria)वाढू लागतात. अशा परिस्थितीत आपण ते पदार्थ खाल्ल्यास त्या पदार्थामुळे पोटासंबंधित मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

भांडी नीट धुवावी

घरात जेव्हा एखादा पदार्थ(Food) बनवण्यासाठी आपण कोणत्याही भांड्यांचा वापर करतो, तेव्हा ती प्रत्येक भांडी नीट धुवावी. ज्यामुळे भांड्यांमध्ये जर बॅक्टेरिया असेल तर ते निघून जातील आणि तुमचे पोटाच्या आजारापासून रक्षण होईल.

भाज्या आणि फळे धुवून खावीत

बाजारात मिळणाऱ्या भाज्या आणि फळांवर विविध प्रकारच्या रासायनिक औषधांची फवारणी केलेली असते. जर बाहेरुन फळे आणून ती न धुता खाल्ल्यास त्यामुळे पोटासंबंधित आजार होण्याची शक्यता असते.

स्वच्छता

स्वयंपाक करताना किंवा जेवताना तुम्ही हात पूर्णपणे स्वच्छ करावेत. अनेकदा बाकीचे काम (Work)करताना हातावर अनेक बॅक्टेरिया जमा होतात शिवाय तसेच आपण त्या हातानी जेवल्यास तेच बॅक्टेरिया पोटात जातात. मग व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंसह चार आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

स्मार्ट मीटरच्या अफवांवर महावितरणचे स्पष्टीकरण; नेमकं काय सांगितलं?

VIRAL VIDEO: वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला अन्...हायवेवरचा थरार, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Makeup Tips: घाम किंवा पावसामुळे मेकअप होणार नाही खराब! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शेताला पाणी देऊन आलो म्हणाले अन् दुकानात आढळला मृतदेह, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT