Children Health Care Saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Health : मुलांना सतत सर्दी-खोकला? हा नैसर्गिक उपाय ठरेल सुरक्षित आणि प्रभावी

Kids Health : पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास वारंवार होतो. औषधांऐवजी आलं, तुळशी आणि मध यांचा घरगुती उपाय रामबाण ठरतो. तज्ज्ञांच्या मते तो सुरक्षित आणि प्रभावी आहे.

Sakshi Sunil Jadhav

पावसाळा सुरू होताच हवामानातील बदलामुळे लहान मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे अनेकदा ही समस्या उद्भवते. अनेकदा रात्रभर खोकल्यामुळे मुलांना झोप येत नाही आणि त्यामुळे पालकांची चिंता वाढते. अशावेळेस औषधे वापरण्याऐवजी काही नैसर्गिक उपाय या त्रासावर प्रभावी ठरू शकतात.

तज्ज्ञांच्या मते आलं आणि तुळशीचा रस हा खोकला आणि सर्दीसाठी रामबाण घरगुती उपाय मानला जातो. काही तुळशीची पानं आणि थोडं आलं एकत्र करून त्याचा रस काढावा आणि मुलाला द्यावा. या मिश्रणात अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. जे शरीरातील विषाणू आणि बॅक्टेरिया दूर करण्यास मदत करतात.

तुम्ही हा उपाय केल्याने फक्त सर्दी-खोकल्यापासून आराम मिळत नाही तर घशातील सूज कमी होते आणि जमा झालेला कफ बाहेर टाकला जातो. जर या रसामध्ये दोन चमचे मध मिसळले तर तो आणखी प्रभावी ठरतो. मधामुळे घशातील जळजळ कमी होते आणि रात्रीच्या खोकल्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. हा उपाय विशेषतः एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी सुरक्षित आहे. १ वर्षाखालील मुलांना मध देणं धोकादायक असू शकतं. त्यामुळे अशा लहान मुलांवर हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, अनेक पालकांना वाटते की, दही खाल्ल्यामुळे मुलांना सर्दी-खोकला होतो. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. सर्दी-खोकल्याचे खरे कारण विषाणूजन्य संसर्ग असतो, दही नाही. त्यामुळे मुलाला दही पचत असेल तर पावसाळ्यात ते देण्यास हरकत नाही.

पावसाळ्यात मुलांच्या सर्दी-खोकल्यासाठी हा घरगुती उपाय नैसर्गिक, सोपा आणि प्रभावी आहे. तरीही, जर लक्षणे दीर्घकाळ टिकली किंवा खोकला तीव्र झाला तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

Crime News: आत्या आणि पुतण्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

India's Richest Person: अब्जाधिशांच्या यादीत 'किंग'ची एन्ट्री, शाहरूख खानची संपत्ती किती?

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

SCROLL FOR NEXT