Monsoon Health Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Health Tips : पावसाळ्यात फिट अँड फाईन राहण्यासाठी हळदीपासून बनवलेले हे पेय प्या, आजार दूर पळतील

How To Boost Immunity Naturally : पावासाळ्यात आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Home Remedies : सध्या पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. पावसामुळे आजारपणही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. पावसाळ्यात आजारपणामुळे लोक त्रस्त झाले आहेत. पावसातील आजारपणापासून वाचायचे असेल तर हळदीचे हे पेय प्या.

पावसाळ्यात साथीचे रोग पसरतात. पावासाळ्यात आरोग्याबाबत विशेष काळजी (Care) घ्यावी लागते. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खुप गरजेचे असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीचे हे पेय घरी बनवा.

हळद ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरते. हळद (Turmeric) ही बाह्य आणि अंतर्गत शरीराला मजबूत बनवते. पावसाळ्यात हळदीचे अनेक पदार्थ शरीरासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळे हळदीचे पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.

लिंबू आणि हळद चहा

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे पेय फायदेशीर आहे. हे पेय बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा लिंबाचा रस, हळद पावडर. चहाची पाने, 1 टी बॅग आणि अर्धा चमचा मधाची आवश्यकता आहे.

रेसीपी - प्रथम एका कढईत एक ग्लास पाणी टाकून उकळा. त्यात हळद घालून गॅस थोडा कमी करा. त्यानंतर चहाची पाने टाका. चहाची पाने टाकल्यानंचर 2-3 मिनिटांनी गॅस बंद करा. आता हे पेय गाळून घेऊन त्यात मध आणि लिंबाचा रस घाला.

हळद चहा

हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला हळद,आले, काळी मिरी, मध, पाणी इत्यादी सामग्री लागेल.

रेसीपी - एका पातेल्यात पाणी उकळून घ्या. नंतर पॅनमध्ये वरील साहित्य टाका. त्यानंतर पॅनमधील पाणी अर्धे होईपर्यंत पाणी उकळून घ्या. त्यानंतर हे पेय गाळून घेऊन त्यात मध टाका.

तुळशी-हळदीचा उष्टा

तुळशी-हळदीचा उष्टा बनवण्यासाठी पाणी, हळद, तुळशीची पाने, गूळ इत्यादी पदार्थांची (Food) आवश्यकता आहे.

रेसीपी - प्रथम एका कढईत २ कप पाणी उकळू घ्या. आता त्यात हळद आणि तुळशीची पाने घाला. पाणी थोडे कमी होईपर्यंत उकळून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. जर तुम्हाला ते गोड बनवायचे असेल तर तुम्ही त्यात गूळ आणि मध घालू शकता.

हळदीचे दूध

पावसाळ्यात प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध हा उत्तम पर्याय आहे. हळद आणि दूध हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी अत्यंत फायद्याचे असतात.

रेसीपी - हळदीचे दूध बनवण्यासाठी प्रथम दूध गरम करुन घ्या. त्यात हळद, दालचिनि पावडर, ठेचलेली काळी मिरी घाला. कोमट झाल्यावर हे पेय हळूहळू प्या. या दूधात तुम्ही मध किंवा गूळही घालू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT