Priya More
पावसाळा हा विविध आजारांना निमंत्रण देणारा ऋतू आहे. पावसाळ्यात आरोग्यविषयी अनेक समस्या निर्माण होतात.
पावसाळ्यात वेगवेगळे आजार डोकं वर काढतात. यामुळे लहानांपासून ते मोठ्यांमुळे सर्वांना धोका निर्माण होतो.
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे खूपच गरजेचे असते.
पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घ्यावी. त्यासाठी वारंवार हात धुवावेत.
सर्दी आणि तापाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहणे फायदेशीर राहिल.
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नियमित भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करावा.
शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी नियमित पुरेसे पाणी प्यावे. तसंच उकळून पाणी प्यावे.
घरामध्ये किंवा घराच्या आसपास पाणी साचून देऊ नका. नाहीतर त्यामध्ये मच्छर होऊन डेंगू किंवा मलेरिया होऊ शकतो.
व्हायरसपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नियमित घरात स्वच्छता ठेवा.
पावसाळ्यामध्ये बाहेरचे आणि उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे.