New Gold Hallmarking Saam Tv
लाईफस्टाईल

New Gold Hallmarking : भारीच! हॉलमार्क नसलेले सोने 30 जूनपर्यंत विकता येणार; मोदी सरकारची 'सोनेरी' भेट

Modi Government On Hallmark Gold : केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ज्वेलर्सला मोठा दिलासा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Old Hallmarked Gold Jewellery : केंद्र सरकारने (Central Government) हॉलमार्क नसलेल्या सोन्याबाबत (Hallmarked Gold Jewellery) मोठा निर्णय घेतला आहे. आता ज्वेलर्सला (Jewellers) विना हॉलमार्कचे सोन्याचे दागिने देखील विकता येणार आहेत.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ज्वेलर्सला मोठा दिलासा दिला आहे. पण यासाठी केंद्र सरकारने कालमर्यादा निश्चित केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार, 30 जूनपर्यंत सोनार त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा साठा हॉलमार्कशिवाय विकू शकतात.

महत्वाचे म्हणजे, केंद्र सरकारने 1 एप्रिल म्हणजेच आजपासून विना हॉलमार्कचे सोने (Gold) खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली होती. पण अशामध्ये आता केंद्र सरकारने विना हॉलमार्कचे सोनं विक्रीबाबत मुदत वाढवल्यामुळे सोनारांना दिलासा मिळाला आहे.

सरकारने देशभरातील जवळपास 16 हजार सोनारांना 30 जूनपर्यंत घोषणा केलेल्या जुने हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने विकण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोनारांना त्यांच्याकडे असलेले जुने हॉलमार्कचे सोन्याचे दागिने विकण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे ही सूट फक्त जुलै 2021 पूर्वी तयार केलेल्या सोन्याच्या दागिन्यांना लागू असणार आहे.

केंद्र सरकारच्या या मोठ्या निर्णयाचा फायदा (Benefits) जवळपास 16 हजार ज्वेलर्सला होणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने 2020 च्या हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा आढावा घेतला. त्यानुसार सोनारांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या हॉलमार्कच्या दागिन्यांच्या स्टॉकबातची माहिती दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत या सोनारांकडे असलेल्या जुन्या हॉलमार्कचे सोनं विकण्यासाठी 30 जून 2023 पर्यंतची मुदत वाढवली आहे.

देशभरामध्ये सध्या 1.56 लाख नोंदणीकृत सोनार आहेत. त्यापैकी 16,243 सोनारांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या हॉलमार्कच्या दागिन्यांच्या स्टॉकबाबत खुलासा केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने या फक्त 16 हजार सोनारांना त्यांच्याकडे असलेले सोनं विकण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी वाढवून दिला आहे.

केंद्र सरकारने आपल्या अधिकृत अधिसूचनेत हे देखील नमूद केलं आहे की, 30 जूननंतर जर एखादा सोनार विना हॉलमार्क असलेले दागिने विकत असेल तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल. सोनारांना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या दागिन्यांचा स्टॉक हा 3 महिन्यांच्या आत संपवायचा आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आणि भारतीय मानक ब्युरो अर्थात बीआयएसने (BIS) 1 एप्रिलपासून सहा डिजिट असलेला अल्फान्यूमेरिक सर्व सोन्याच्या दागिन्यांवर अनिवार्य केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT