Gold Rate : गुढीपाढवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाढव्यापासूनच होते. त्यामुळे हिंदू धर्मात या सणाला फार महत्व आहे. या दिवशी अनेक व्यक्ती सोने खरेदी करतात. त्यामुळे आज सोने- चांदीचे दर काय आहेत हे जाणून घेऊ. (Gudi Padwa festival)
सोन्या-चांदीच्या किंमतीचे दर जाहीर झाले आहेत. काल सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली होती. २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल ५४० रुपयांनी घसरला होता. त्यामुळे काल अनेकांनी सोने खरेदी करण्याचा विचार केला. आता आज देखील तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर आजच्या किंमती एकदा पाहून घ्या. कारण आज सोन्याच्या दरात तब्बल २२० रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचे दर देखील काल १०० रुपयांनी घसले होते ते दर आता पुन्हा एकदा १०० रुपयांनी वाढले आहेत.
आज सोन्याचा भाव काय?
मंगळवारी सराफा बाजार उघडताच सोने- चांदीचे दर जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ५५,१५० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ६०,१५० रुपये इतका आहे.
आज चांदीचा भाव काय?
आज सोन्यासह चांदीच्या दरांमध्ये देखील वाढ झाली आहे. काल सराफा बाजारात चांदीचे दर ७२,००० रुपये प्रति किलो होते. तर आजा प्रति किलो चांदीचा भाव ७२,१०० रुपये इतका झाला आहे. एक ग्राम चांदीची किंमत ७२.१० रुपये इतकी आहे. तर १०० ग्राम चांदीची किंमत ७,२१० रुपये इतकी आहे.
चार प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर
मुंबई (Mumbai)मध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०,००० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५,००० रुपये इतका आहे.
चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०,७०० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५,७०० रुपये इतका आहे.
नवी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०,१५० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५,१५० रुपये इतका आहे.
कोलकत्तामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ६०,००० रुपये इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५,००० रुपये इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.