सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे फोन असतो. घरातील लहान मुलांची जशी काळजी आपण घेतो त्याच प्रमाणे फोनचीही काळजी आपण घेतो असे म्हटले तरी वावगं ठरणान नाही. नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर सर्वात आधी आपण फोनसाठी चांगल्या दर्जाचे फोन कव्हर आणि महत्वाचे म्हणजे ,स्क्रीनगार्ड घेऊन आपल्या फोनला प्रोटेक्ट करतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
स्क्रीनगार्ड असल्यामुळे आपल्याला असे वाटते की, आपला फोन सेफ आहे पण बऱ्याचदा ते असून सुद्धा आपल्या फोनची स्क्रीन तुटते. काही लोक १०० रुपयांचे स्क्रीन गार्ड वापरतात ते फक्त फोनच्या स्क्रीनला स्क्रॅच येण्यापासून वाचवत असते.मात्र तुम्हाला माहिती आहे का जे स्क्रीनगार्ड आपण मोबाईलचे संरक्षण होण्यासाठी वापरतो ते स्क्रीनगार्ड आपल्या मोबाईलचे आणखी नुकसान करतात.काही दिवसांपूर्वीच Xiaomi ने मोबाईल डिस्प्लेवर स्क्रीनगार्ड लावणाऱ्या प्रत्येक मोबाईल यूजर्ससाठी एक माहिती शेअर केली आहे. नक्की काय म्हणाली Xiaomi कंपनी जाणून घ्या.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर Xiaomi कंपनीने @@RedmiIndiaया अकाऊंटला एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात लिहिले आहे की स्क्रीनगार्ड म्हणजेच स्क्रीन प्रोटेक्टर हे स्मार्टफोन डिस्प्लेला कसे नुकसान करु शकते. स्मार्टफोनमध्ये स्क्रॅच-प्रतिरोधक काच असली तरीही ते फोनचे नुकसान करु शकते.
UV अॅडहेसिव्ह प्रोटेक्टर
प्रत्येक व्यक्ती फोनला स्क्रीनगार्ड लावतात. बाजारात अनेक किंमतीनुसार स्क्रीन गार्ड उपलब्ध होताक त्यापैकी एक UV अॅडहेसिव्ह प्रोटेक्टर आहे जे तुमच्या फोनसाठी सुरक्षित मानले जाते. मात्र कंपनीने कंपनीने ग्राहकांनी लिक्विड यूव्ही ॲडहेसिव्ह प्रोटेक्टरसह सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.
स्क्रीन गार्ड बदल
मार्केटमध्ये (Market)दोन प्रकारचे स्क्रीन गार्ड मिळतात त्यातला एक प्लास्टिक पासून बनवलेले असतात.आणि दुसरा काचेपासून बनवलेले असतात.स्क्रीन गार्ड तुमच्या फोनच्या ब्रँडनुसार डीझाईन केलेले असतात त्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहतो पण त्यापैकी बहुतांशी प्लास्टिक किंवा टेम्पर्ड ग्लासमध्ये उपलब्ध आहे तसते 2D , 3D,4D,5D,6D, 9D तसेच 11D असे अनेक प्रकारचे स्क्रीन गार्ड असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.