Mini Stroke Symptoms Saam Tv
लाईफस्टाईल

Mini Stroke Symptoms : मिनी स्ट्रोक कसा येतो? त्याची लक्षणे कोणती? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Mini Stroke Causes :

मेंदू हा आपल्या शरीराचा मुख्य अवयव आहे. आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांचे कार्य सुरळीत करण्याचे काम हे मेंदूपासून सुरु होते. परंतु, सध्या तरुणांमध्ये मेंदूच्या आजाराबद्दल अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहे.

गंभीर आजारांपैकी एक स्ट्रोक. स्ट्रोकमध्ये मेंदूचा रक्तप्रवाह थांबतो. स्ट्रोक हा अत्यंत धोकादायक आहे. मेंदूला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यास ही समस्या निर्माण होते. अनेक वेळा चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे (Lifestyle) शरीरात खराब कोलेस्टेरॉल वाढते.

या परिस्थितीत शिरामध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे स्ट्रोक येण्याची भीती निर्माण होते. रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूला होणारा वाढता रक्तपुरवठा विस्कळीत होतो. पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा न मिळाल्याने मिनी स्ट्रोक किंवा इस्केमिक अटॅक येतो. याची लक्षणे (Symptoms) कोणती? जाणून घेऊया

1. मिनी स्ट्रोक म्हणजे काय?

मिनी स्ट्रोक म्हणजे अर्धांगवायू. ही स्थिती काही काळ टिकून राहाते. ज्यामध्ये व्यक्तीला चालण्यास अधिक अडचणी येतात. तसेच हात आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवतो. बोलण्यात आणि समजण्यात अडचणी येतात. काही काळ व्यक्तीला चक्कर येण्यासारखी लक्षणे जाणवतात. ही लक्षणे काही काळ जाणवल्यानंतर त्याला मिनी स्ट्रोक म्हटले जाते.

2. मिनी स्ट्रोकची लक्षणे

1. चालताना अडचणी

जेव्हा मिनी स्ट्रोक येतो तेव्हा समोरच्याला चालण्यात अडचणी येतात. चालताना अचानक घाम येणे, दचकणे यांसारख्या समस्या जाणवू लागतात.

2. चेहऱ्याचे रुप बदलणे

जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागापर्यंत रक्त पोहोचणे थांबते तेव्हा पक्षाघाताची समस्या वाढते. अशावेळी चेहरा वाकडा होऊ लागतो. कधी कधी चेहरा हलवण्यास त्रास होतो. अशा वेळी डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यावा.

3. हाता-पायांना मुंग्या येणे

मिनी स्ट्रोकमध्ये व्यक्तीच्या हातापायांना मुंग्या येतात. तसेच कोणतीही वस्तू उचलताना कमकुवतपणा जाणवणे तसेच चक्कर येते. अशक्तपणा येऊन संतुलन राखण्यात अडचण येते.

4. बोलण्यात अडचण

स्ट्रोकमुळे बोलण्यात अडचण येते. इच्छा असूनही रुग्णाला बोलता येत नाही. बोलताना अस्पष्टता वाढते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT