Use milk for glowing skin Google
लाईफस्टाईल

Milk For Skincare : अशाप्रकारे करा त्वचेसाठी दुधाचा वापर, त्वचा होईल टवटवीत, चेहरा दिसेल तरूण

Milk for Glowing Skin : दूधामधील लॅक्टिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स व नैसर्गिक एंझाइम्स त्वचेला स्वच्छ, उजळ व टवटवीत ठेवतात, तसेच सुरकुत्या, डाग व टॅनिंग कमी करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकालच्या धावपळीच्या जीवनात त्वचेची काळजी घेणे कठीण होते. कामासाठी बऱ्याचवेळा बाहेर जावे लागते. प्रवासात बाहेरील धुळ, सुर्यप्रकाशाची किरणे त्वचेला नुकसान पोहोचवतात. यामुळे त्वचा निस्तेज होणे, काळवणणे, त्वचेवर सुरकुत्या येणे यांसारख्या समस्या उद्धवतात. आणि त्वचा लवकर म्हातारी होण्याची शक्यता असते. अशात स्कीन केअरसाठी पार्लरमध्ये तासन् तास वेळ घालवणं सगळ्यांनाच जमत नाही. पण तुम्ही त्वचेसाठी योग्य पद्धतीने दुधाचा वापर केल्यास या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

दूध त्वचेच्या आरोग्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. दूधामध्ये अनेक पौष्टिक तत्त्व आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. यामधील लॅक्टिक अॅसिड आणि अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड नैसर्गिकरित्या चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते, सनटॅनिंग कमी करते व नितळ आणि उजळ त्वचा देते. दूध त्वचेवर क्लिंझरच्या स्वरूपात काम करते. शिवाय दुधाचा क्रिमी टेक्श्चर त्वचेत मऊपणा आणतो. यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे त्वचेचा रंग तेजस्वी दिसतो.

दुधामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेसाठी उपयुक्त असलेले कोलेजन उत्पादन वाढवतात. यामुळे त्वचा टवटवीत राहते व लवकर म्हातारीही होत नाही. तसेच चेहऱ्यावर येणाऱ्या बारीक रेषा आणि सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते. दूध अतिशय सौम्य व थंड गुणधर्माचे असल्यामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इरीटेशन होत नाही. यामुळे ते संवेदनशील त्वचेवरही वापरता येते. यातील नैसर्गिक एंन्जाइम्स काळे डाग आणि हायपरपिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते.

निरोगी त्वचेसाठी योग्यप्रकारे दूधाचा वापर कसा कराल?

१. बाहेर जाऊन आल्यावर चेहरा स्वच्छ करण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करा. कच्च्या दुधात कापसाचा बोळा भिजवा व तो हलक्या हाताने चेहऱ्यावर चोळा.

२. चेहऱ्यासाठी बेसन, कॉफी किंवा मुलतानी मातीचा फेस पॅक बवनताना त्यात पाण्याऐवजी दुधाचा वापर करा.

३. त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात थोडे दुध मिसळा.

४. चेहऱ्यावर जळजळ होत असल्यास दूधाची थंड झालेली मलई लावा.

टिप : दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असल्यास, कोणत्याहीप्रकारे दुधाचा वापर करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; आणखी ४४६ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द, महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश

Abir Gulaal Release: दिलजीत दोसांझचे नियम फॉलो करतोय फवाद खान; अबीर गुलाल 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Maharashtra civic polls : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेस नेत्याची मोठी मागणी, पत्रात काय म्हटलंय?

कृष्ण जन्माष्टमीला घरात कोणत्या ठिकाणी मोरपिस ठेवणं शुभ?

Nurse: नर्सला 'सिस्टर' का म्हणतात? कधीपासून सुरू झाली ही प्रथा

SCROLL FOR NEXT