Menstruation Pain Food Saam Tv
लाईफस्टाईल

Menstruation Pain Food : मासिक पाळीत खूप जास्त त्रास होतो? आहारात या ५ पदार्थांचा समावेश करा, पोटदुखी आणि कंबरदुखी होईल कमी

Best Foods for Period : पाठदुखी, कंबरदुखी खूप प्रमाणात होते. तसेच क्रॅम्प येतात. या वेदना कमी करण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करावा.

कोमल दामुद्रे

Foods That Help Reduce Period Cramps :

महिलांना दर महिन्यात मासिक पाळी येते. ही नैसर्गिक क्रिया आहे. दर महिन्यात मासिक पाळीच्या ४-५ दिवस खूप त्रास होतो. पाठदुखी, कंबरदुखी खूप प्रमाणात होते. तसेच क्रॅम्प येतात. या वेदना कमी करण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करावा.

मासिक पाळीच्या काळात आराम करणे महत्त्वाचे असते.या काळात पुरेशी झोप घेणे देखील महत्त्वाचे असते. रात्री किमान ८ तासाची झोप घ्यायची असते. तसेच उत्तम पौष्टक आहार घेतल्याने कमी त्रास होतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. कॅफेनचा आहारत समावेश करु नये

मासिक पाळीत कॅफेनयुक्त पदार्थ खाऊ नये. जास्त प्रमाणात चहा-कॉफी प्यायल्याने जळजळ होते. पोट फुगते तसेच अनेक पोटाचे विकार होऊ शकतात. या काळात तुम्ही हर्बल चहा पिऊ शकतात. या काळात डार्क चॉकलेट खाणे चांगले असते. त्यामुळे मूड चांगला राहतो.

2. दही-भात

मासिक पाळीच्या काळात दही (Curd) खाल्ल्याने पोटात थंडपणा जाणवतो. त्यामुळे या काळात जेवणात दही भात खावा. दही भात हा हलका आहार असतो. त्यामुळे शरीरास फायदा होतो.

3. भरपूर पाणी प्या

मासिक पाळीत खूप पाणी (Water) पिणे आरोग्यासाठी चांगले असते. काकडी किंवा फळे खा. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही.

4. ड्रायफ्रुट्स

मासिक पाळीत आहारात ड्रायफ्रुट्सचा (Dryfruits) समावेश करा. या काळातत काजू, बदाम आणि शेंगगदाणे खाणे चांगले असते. नाश्ता करताना गुळासोबत शेंगजाणे खा. गुळात अँटी इम्फ्लामेंटरी आणि अँटीस्पास्मोडिक गुण असतात. त्यामुळे अशक्तपणा येत नाही. तसेच आयन आणि मॅग्नेशियम शरीरास मिळते आणि पचनक्रिया चांगली होते. तसेच रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खालल्याने आराम मिळतो.

5. खिचडी

मासिक पाळीत हलका आहार चांगला असतो. या काळात तळलेले, तुपाचे पदार्थ जास्त खाऊ नये. त्यामुळे खिचडी हा उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही वेगगवेगळ्या डाळी आणि तांदळाची खिचडी बनवू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT