Matheran Mini Train Saam TV
लाईफस्टाईल

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; माथेरानची राणी १ नोव्हेंबरपासून रुळावर धावणार

Ruchika Jadhav

Matheran Mini Train: ऑक्टोबर महिना संपत आला आहे. नोव्हेंबरपासून गुलाबी थंडीला सुरुवात होणार आहे. हिवाळा सुरू झाला की, अनेक पर्यटक बाहेर फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. यात बरेच जण हिल स्टेशन्सला भेट देतात. मुंबईकरांसाठी सर्वात जवळच एक हिल स्टेशन म्हणजे माथेरान. माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनिट्रेन पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली होती. आता पावसाळा संपून हिवाळ्याला सुरुवात होत असल्याने मिनिट्रेन देखील लवकरच सुरू होणार आहे.

या तारखेपासून सुरू होणार ट्रेन

प्रशासनाकडून यावर माहिती देण्यात आली आहे. नेरळ माथेरान मिनिट्रेन सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होतेय. मिनिट्रेन दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने बंद असते. येथे घाटरस्त्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते, त्यामुळे ट्रेन बंद ठेवली जाते.

१५ ऑक्टोबरनंतर ही सेवा सुरू होते असेत. मात्र, यावर्षी मिनिट्रेन सुरू होण्यास बराच विलंब झाला आहे. विलंब होण्यास काही तांत्रिक बाबी होत्या अशी माहिती मिळाली आहे.

शटल सेवेवर भार

माथेरानमध्ये दरवर्षी सुमारे १५ लाखांच्या आसपास पर्यटक भेट देतात. सध्या येथे जाण्यासाठी अमनलॉज ते माथेरान रेल्वे स्थानकादरम्यानची मिनी ट्रेनची शटल सेवा सुरू आहे. या गाडीच्या दररोज आठ फेऱ्या होत आहे. त्यामुळे आता पर्यटकांचे आकर्षण असलेली नेरळ-माथेरान मिनिट्रेन सेवा सुरू झाल्यास पर्यटकांना मोठा आनंद होणार आहे.

माथेरानमधील गर्ड झाडी, डोंगर आणि येथील निसर्गरम्य दृष्य मन प्रसन्न करणारे आहे. येथे अनेक पर्यटक मिनिट्रेनची सफर करण्यासाठीच येतात. मात्र या ट्रेनच्या फेऱ्या फार कमी आहेत. त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ खोळंबा होतो. अशात मिनिट्रेनच्या फेऱ्या वाढवल्यास पर्यटकांसाठी ते आणखी उत्तम होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: अॅसिडीचा त्रास होतोय? रोज खा अंजीर

Maharashtra Politics: 'आमदारकी पणाला लावून गुवाहाटीला गेलो म्हणून भाजपची सत्ता...', शिंदेंच्या आमदारांचा अमित शहांवर पलटवार

Maharashtra News Live Updates: सर्वच पक्षाचा सस्पेन्स कायम असतो, २२ तारखेपासून उमेदवारी भरायची - धनंजय मुंडे

Beed Vidhan Sabha : बीडमध्ये शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी समोर; उमेदवारी कोणाला? पक्षप्रमुखासमोर असणार आव्हान

IND vs NZ : रोहित २, विराट ०, राहुल ०...'किवी'पुढे भारताचा ४६ धावांत सुपडा साफ, टीम इंडियाचं नेमकं चुकलं काय?

SCROLL FOR NEXT