ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाची चाहुल लागताच मुंबईकर असो वा अन्य ठिकांणाचे पर्यटक माथेरानला येण्याचा विचार करतात.
पावसाला गेल्या महिन्याभरापासून सुरुवात झालेली आहे. अनेक पर्यटक माथेरानला फिरुनही आले असतील.
परंतू जर तुम्ही येत्या काही दिवसांत माथेरानला फिरायला जाण्याचा विचार करताय तर एकदा पुढील गोष्टी पाहा.
सध्या मुंबईसह सर्व क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे या अशा पावसात माथेरानला जाणे काहीसे धोकादायक ठरु शकते.
आज विकेंडवार असलेल्याने अनेकजण माथेरानच्या दिशेने जात आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते.
मुसळधार पावसाने माथेरानच्या काही ठिकाणी दरड कोसळ्याच्या घटना होण्याची भिती आहे, त्यामुळे पाऊस कमी होण्याच्या अंदाजाने प्लान करा.
जर तुम्ही लहान मुलांसह माथेरानला जाण्याचा विचार करताय तर तेथिल गर्दीचा अंदाज घ्या.अनथ्या मुलांसह तिथे जाणे टाळा.