Maruti Wagon R Maruti Wagon R Information-Saam Tv
लाईफस्टाईल

Maruti Car: चार व्हेरिएंट, 341 लीटर बूट स्पेस; 6 लाखांपेक्षा कमी किमतीत येते मारुती 'ही' डॅशिंग कार

Maruti Wagon R: चार व्हेरिएंट, 341 लीटर बूट स्पेस; 6 लाखांपेक्षा कमी किमतीत येते मारुती 'ही' डॅशिंग कार

Satish Kengar

Maruti Wagon R:

भारतात 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या मिड सेगमेंट वाहनांना खूप मागणी आहे. मारुती सुझुकीची वॅगन आर ही या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. या कारने ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक 22080 युनिट्सची विक्री केली आहे. यानंतर मारुती स्विफ्टच्या एकूण 20598 युनिट्सची विक्री झाली.

तिसर्‍या क्रमांकावर टाटा नेक्सॉन 16887 युनिट्स विकली गेली. मारुती वॅगन आर ही सलग दुसऱ्या महिन्यात सर्वाधिक विक्री होणारी कार राहिली आहे. यापूर्वी गेल्या सप्टेंबरमध्ये एकूण 16250 युनिट्सची विक्री झाली होती. या महिन्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मारुती स्विफ्टच्या एकूण 14703 युनिट्सची विक्री झाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

341 लीटरची मोठी बूट स्पेस

मारुतीची वॅगन आर सीएनजीमध्येही येते. LXi, VXi, ZXi आणि ZXi+ हे त्याचे चार व्हेरिएंट बाजारात उपलब्ध आहेत. ही कार एक्स-शोरूम 5.55 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. कारचे टॉप मॉडेल 7.43 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये ऑफर करण्यात आले आहे. या कारमध्ये 341 लीटरची मोठी बूट स्पेस आहे. त्यामुळे जास्त सामान घेऊन मोठ्या कुटुंबासोबत सहज प्रवास करता येतो.

कारमध्ये पॉवर देण्यासाठी 1-लिटर इंजिन आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार CNG वर 34.05 किमी/किलो मायलेज देते. तसेच ही हॅचबॅक कार पेट्रोलवर 25.19 kmpl मायलेज देते. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. बाजारात याची प्रतिस्पर्धी टाटा टियागो आणि सिट्रोएन C3 आहेत. (Latest Marathi News)

कारमध्ये मिळेल 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले

मारुती वॅगन आर मध्ये एकूण आठ रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. यात ड्युअल टोनचा पर्यायही आहे. कारमध्ये रियर पार्किंग सेन्सर उपलब्ध आहे. मिड सेगमेंटच्या या हॅचबॅक कारमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. कार 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते. ही कार चार स्पीकरसह स्टीयरिंग-माउंट ऑडिओ सिस्टमसह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT