Upcoming Smartphones: Nokia च्या चाहत्यांसाठी खुशखबर! कंपनी लवकरच मिड-बजेट Smartphones करणार लॉन्च

Nokia च्या चाहत्यांसाठी खुशखबर! कंपनी लवकरच मिड-बजेट Smartphones करणार लॉन्च
Nokia Upcoming Smartphones
Nokia Upcoming SmartphonesSaam Tv
Published On

Nokia Upcoming Smartphones:

नोकियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच कंपनी बजेट आणि मिड-बजेट रेंजमध्ये काही स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. HMD ग्लोबल पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे नवीन मॉडेल नोकिया ब्रँडिंग अंतर्गत येणार नाहीत, तर त्याऐवजी एचएमडी ग्लोबल नावाने येऊ शकता, असं बोललं जात आहे.

HMD ग्लोबल-ब्रँडेड फोन भारतात 2024 मध्ये होणार लॉन्च

एचएमडी ग्लोबल हा जागतिक बाजारपेठेत नोकिया-ब्रँडेड स्मार्टफोनसाठी परवानाधारक आहे. 91Mobiles च्या नवीन अहवालात असं सांगण्यात आलं आहे की, कंपनी नवीन मॉडेल्सवर काम करत आहे, ज्यात HMD ग्लोबल ब्रँडिंग असेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nokia Upcoming Smartphones
Ultra HD TV: 1 लाखांचा 55 inch 4K TV फक्त 22000 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?

याशी संबंधित असलेल्या उद्योग सूत्रांनुसार, ब्रँड एप्रिल 2024 पर्यंत भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. ही मॉडेल्स स्पर्धात्मक किंमतींसह येतील आणि Amazon, Flipkart आणि इतर ऑनलाइन चॅनेलवर उपलब्ध असतील. (Latest Marathi News)

अहवालात म्हटले आहे की, HMD ग्लोबल ऑफलाइन चॅनेलद्वारे नोकिया फोन विकण्यावर लक्ष केंद्रित करेल. कंपनी 2026 पर्यंत एचएमडी ग्लोबल आणि नोकिया ब्रँडेड उपकरणे देखील विकणार आहे.

Nokia Upcoming Smartphones
Upcoming Bikes: एअर कूल्ड इंजिन, जबरदस्त लूक; येतेय नवीन Royal Enfield Himalayan 450

सूत्रांचं म्हणणं आहे की, कंपनी ही उपकरणे बजेट आणि मिड-रेंज अशा दोन्ही रेंजमध्ये लॉन्च करेल. यातच कंपनीची फ्लॅगशिप मॉडेल्सची देखील योजना आहे. हे मॉडेल बाजारातील प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक OS अपडेट ऑफर करतील. अलीकडेच दोन नवीन HMD ग्लोबल स्मार्टफोन्स IMEI डेटाबेसवर स्पॉट झाल्याचा अहवाल आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com