Upcoming Bikes: एअर कूल्ड इंजिन, जबरदस्त लूक; येतेय नवीन Royal Enfield Himalayan 450

Royal Enfield Upcoming Bikes: एअर कूल्ड इंजिन, जबरदस्त लूक; येतेय नवीन Royal Enfield Himalayan 450
Royal Enfield Himalayan 450
Royal Enfield Himalayan 450Saam Tv
Published On

Royal Enfield Upcoming Bikes:

रॉयल एनफिल्ड प्रेमी बर्याच काळापासून हिमालयन 450 ची वाट पाहत आहेत. अलीकडेच कंपनीने याच्या फीचर्सची माहीती उघड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या नवीन बाईकच्या किमती 7 नोव्हेंबरला जाहीर करणार आहे.

Royal Enfield Himalayan 450 ही कंपनीची सिंगल सिलिंडर इंजिन बाईक आहे, ज्यामध्ये एअर कूल्ड इंजिन आहे. लांबच्या प्रवासात हे इंजिन लवकर तापत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Royal Enfield Himalayan 450
Flipkart Sale: Motorola चे Smartphones स्वस्तात खरेदी करण्याची संधी, 14,000 रुपयांपर्यंत मिळत आहे सूट

452 cc चे पॉवरफुल इंजिन

या बाईकला 452 cc चे पॉवरफुल इंजिन मिळेल. हे पेट्रोल इंजिन 40 एचपीची हाय पॉवर आणि 40 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. या मोठ्या आकाराच्या बाईकची उंची 825 आणि 845 मिमी असेल, असा अंदाज आहे. ही 8000 rpm जनरेट करेल. ही एक हाय एंड बाईक आहे, ज्यामध्ये बुलेट हेडलाइट्स आहेत. या बाईकमध्ये लांब आणि आरामदायी हँडल बार आहे. (Latest Marathi News)

Royal Enfield Himalayan 450 ला 6 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. यात स्लिप असिस्ट क्लच असेल, जो हाय स्पीड देण्यास मदत करेल. याला एक स्टायलिश नवीन ट्विन-स्पार फ्रेम मिळेल, ज्यामुळे ती दिसायला अधिक आकर्षक होईल. यात आरामदायी स्प्लिट सीट आहेत. बाईकमध्ये डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत.

Royal Enfield Himalayan 450
Jimny To Bolero; या सहा SUVs वर मिळत आहे 3.50 लाखांची सूट, पाहा लिस्ट

खडबडीत रस्त्यांवर सुरळीत प्रवास करण्यासाठी बाईकला ओपन-काट्रिज USD फोर्क आणि प्रीलोड-अ‍ॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. Royal Enfield Himalayan 450 ला 230 mm चा ग्राउंड क्लीयरन्स मिळेल. ज्यामुळे बाईक डोंगरावर किंवा उंचावरील रस्त्यावर सहज प्रवास करू शकेल. बाईकच्या एक्झॉस्टवर कव्हर उपलब्ध असेल. त्यात ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

Royal Enfield Himalayan 450 मध्ये समोर 21-इंच वायर-स्पोक रिम्स आणि मागील बाजूस 17-इंच वायर-स्पोक रिम्स मिळतील. ज्यामुळे याला रेट्रो लुक मिळेल. बाईकचा टॉप स्पीड 140 किमी प्रतितास असेल. यात टर्न इंडिकेटर, हिमालयन बॅच आणि विंड शील्ड मिळेल. याच्या इंजिनवर ब्लॅक थीम असून इंधन टाकीवर ग्राफिक्स उपलब्ध असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com