Maruti Suzuki India Saam Tv
लाईफस्टाईल

Maruti Suzuki India: वॅगन-आर, अल्टो, स्विफ्ट, मारुतीच्या गाड्यांवर बंपर सूट

मारुती अल्टोला 'STD' ट्रिमवर 10,000 रुपयांची रोख सवलत मिळत आहे. तर इतर ट्रिमवर 15,000 रुपयांची रोख सूट मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) जाहीर केले की, ते जानेवारीत गाड्यांच्या किमती वाढवणार आहे. वाहनांच्या किमतीतील वाढीला ऑफसेट करण्यासाठी कंपनीने त्यांच्या गाड्यांवर काही सवलतही जाहीर केली आहेत (Maruti Suzuki India is offering huge discounts on there cars).

मारुती अल्टोला 'STD' ट्रिमवर 10,000 रुपयांची रोख सवलत मिळत आहे. तर इतर ट्रिमवर 15,000 रुपयांची रोख सूट मिळणार आहे. 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील देण्यात येणार आहे. अल्टोच्या CNG प्रकारावर कोणतीही ऑफर नाही. S-Presso वर निर्माता 15,000 रुपयांची रोख सूट देत आहे. 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

Celerio आणि Swift वर किती सूट?

Maruti Celerio वर, नवीन आणि जुन्या दोन्ही मॉडेल्सवर रोख सवलत नाही. 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट कारवर उपलब्ध आहे. स्विफ्टसाठी, 10,000 रुपयांची रोख सूट आहे. यासोबतच 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

मारुती वॅगन-आरवर प्रचंड सूट

मारुती वॅगन-आरवर 10,000 रुपयांची रोख सूट आहे. याशिवाय, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. या ऑफर या कारच्या CNG प्रकारांसाठी नाहीत.

मारुती Eeco वर 10 हजारांची सूट

Maruti Ertiga वर सध्या कोणत्याही सवलती किंवा ऑफर नाहीत. निर्माता Eeco वर 10,000 रुपयांची रोख सूट देत आहे. 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटसह 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील आहे.

मारुती डिझायरवर 10 हजारांची सूट

मारुती डिझायरवर 10,000 रुपयांची रोख सवलत उपलब्ध आहे. 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटसह 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे. मारुतीची कॉम्पॅक्ट SUV - Vitara Brezza 5,000 च्या रोख सवलतीसह येते. 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

SCROLL FOR NEXT