Marriage In Relatives Saam TV
लाईफस्टाईल

Marriage In Relation: नात्यात लग्न करताय मग जरा थांबा...; अन्यथा तुमच्या बाळालाही होऊ शकतात या व्याधी

Marriage In Relatives: जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते.

डॉ. माधव सावरगावे

Marriage Tips: नात्यात लग्न करणं धोक्याचं ठरतंय. कारण लग्नानंतर त्या कुटुंबियांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात २५ टक्के विवाह जवळच्या नात्यामध्ये होतात. काही समाजात याचे प्रमाण जास्त आहे. मात्र जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते.

त्यात मामाची मुलगी- आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण बरेच आहे. मात्र नात्यातील विवाहामुळे अपत्याला गतिमंदतेसह इतर आजारांचा धोका असतो. मुलांचा बुद्ध्यांक इतर मुलांपेक्षा कमी असल्याचे संशोधनात आढळून आले. इतरही आजार उद्भवतात, असे डॉ. निलेश लोमटे, हार्मोन्सतज्ज्ञ यांनी सांगितले आहे. (Viral News)

कोणत्या आजारांची शक्यता आहे?

  • नात्यातील लग्नामुळे जन्माला आलेल्या बालकांना गतिमंदपणा, थॅलेसेमिया, सिकलसेल, हिमोफेलिया, जेनेटिक आणि दुर्मीळ आजार होऊ शकतात.

  • गर्भामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचे व्यंग यातून बाळाचे डोके तयार न होणे, मणक्यामध्ये फट असणे अशा समस्या निर्माण होतात.

  • हृदयाचे जन्मजात व्यंग, अन्ननलिका तयार न होणे, अन्ननलिका आणि श्वासनलिका जन्मजातच जोडली गेलेली असणे, बहिरेपणा, अंधत्व, दुभंगलेले ओठ, टाळू, गर्भपात, गर्भाची वाढ मंदावणे आदींना सामोरे जावे लागते.

  • 'थॅलेसेमिया'चाही धोका आहे. शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने थॅलेसेमिया हा आजार होतो. जवळच्या नात्यात लग्न करण्याचे प्रमाण जास्त असलेल्या समाजात थॅलेसेमिया अधिक प्रमाणात आढळून येतो.

  • दोन मायनर थॅलेसेमियाग्रस्तांनी विवाह केला, तर जन्माला येणारे मूल 'थॅलेसेमिया मेजर' राहण्याची शक्यता असते, अशा मुलांना दर महिन्याला रक्त द्यावे लागते.

  • नात्यात लग्न केल्याने हार्मोन्सचे दुर्मीळ आजार होऊ शकतात. जन्माला येणारे अपत्य मुलगा की मुलगी आहे, याचे निदान होण्यास अडचणही होते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

  • नात्यात लग्न केले म्हणजे होणाऱ्या अपत्याला आजार होतोच असे नाही. परंतु अपत्यांना विविध आजारांचा धोका नाकारता येत नाही. काही समाजात नात्यात लग्न केले जाते. अशा समाजात थॅलेसेमिया अधिक प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे नात्यात लग्न टाळलेले बरे, असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. आता भविष्यातील धोका लक्षात घेऊन हा विचार तरी एकदा करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT