Weeding Dates Canva
लाईफस्टाईल

New Year Astrology 2024: शुभमंगल सावधान! २०२४ मध्ये विवाह मुहूर्त किती? पंचागकर्ते दा. कृ सोमण यांनी दिली माहिती

Wedding Dates in 2024 by Panchang : नव्या वर्षात चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ असणार आहे. तसेच वर्षभरात चांगले विवाह मुहूर्त देखील आहेत,अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ सोमण यांनी दिली आहे.

Vishal Gangurde

विकास काटे, ठाणे

New Year Astrology 2023:

यंदा ३१ डिसेंबरला लीप सेंकद नाही. त्यामुळे नूतन वर्षात भारतातून एकही ग्रहण दिसणार नाही. तर पुढील वर्षांत दोन पौर्णिमांना सुपरमून दर्शन दिसणार आहे. तर चाकरमान्यांसाठी सुट्यांची चंगळ असणार आहे. तसेच वर्षभरात चांगले विवाह मुहूर्त देखील आहेत,अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ सोमण यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सोमवारी १ जानेवारी रोजी नव्या वर्षाचा प्रारंभ होत आहे. यावर्षी सन २०२३ मध्ये लिप सेकंद धरला जाणार नाही. त्यामुळे नूतन वर्षाचा प्रारंभ रविवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ठिक १२ वाजता होणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितली.

सन २०२४ या नूतन वर्षाविषयी अधिक माहिती सांगताना दा. कृ. सोमण म्हणाले की, सन २०२४ हे लीप वर्ष असल्याने या वर्षात जास्त काम करण्यासाठी आपणासर्वांस एक दिवस जास्त मिळणार आहे. सन २०२४ मध्ये ३६५ ऐवजी ३६६ दिवस असणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतात ग्रहण दिसणार नाही

सन २०२४ मध्ये (१) २५ मार्च रोजी छायाकल्प चंद्रग्रहण , (२) ८ एप्रिल रोजी खग्रास सूर्यग्रहण, (३) १८ सप्टेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण, (४) २ ॲाक्टोबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. परंतू यापैकी एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही.

दोनदा सुपरमून दिसणार

सन २०२४ मध्ये १८ सप्टेंबर आणि १७ ॲाक्टोबर या दोन पौर्णिमांना सुपरमून ( चंद्रबिंब १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित ) दिसणार आहेत.

चाकरमान्यांची चंगळ

सन २०२४ मध्ये २४ सार्वजनिक सुट्ट्यांपैकी २ सुट्या रविवारी येणार आहेत. २२ सुट्या इतरवारी येणार असल्याने चाकरमान्यांची सुट्ट्यांसंबंधी चंगळ होणार आहे.

अंगारकी संकष्ट चतुर्थी योग कधी?

सन २०२४ मध्ये सोनेखरेदी करणारांसाठी २५ जानेवारी, २२ फेब्रुवारी, २६ सप्टेंबर, २४ ॲाक्टोबर आणि २१ नोव्हेंबर असे ५ गुरुपुष्य योग येणार आहेत. गणेश भक्तांसाठी २५ जून रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी योग येणार आहे.

विवाह मुहूर्त कधी?

विवाहेच्छुकांसाठी सन २०२४ मध्ये जानेवारीमध्ये १२, फेब्रुवारीमध्ये १३, मार्चमध्ये ८, एप्रिलमध्ये १०, मेमध्ये २ , जूनमध्ये २, जुलैमध्ये ६, नोव्हेंबरमध्ये ६ आणि डिसेंबरमध्ये १३ विवाह मुहूर्त दिले आहेत असे श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT