Margashirsha Guruvar Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Margashirsha Guruvar Recipe : मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी नैवेद्यात बनवा नारळाच्या दुधातली तांदळाची खीर, झटपट बनेल

Coconut milk Kheer Recipe : नैवेद्यासाठी तुम्ही स्वादिष्ट अशी नारळाच्या दुधातली तांदळाची खीर बनवू शकता. कमी साहित्यात तुम्ही अस्सल केरळी पारंपारिक पायसम अर्थात तांदळाची खीर बनवू शकता.

कोमल दामुद्रे

Kerala Payasam Recipe :

मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी अनेकजण उपवास करतात. आजपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महालक्ष्मीचे गुरुवारी व्रत केले जाईल. महालक्ष्मीची मनोभावे पूजा करुन नैवेद्यही अर्पण केला जातो.

नैवेद्य पटकन तयार होईल असा काहीतरी पदार्थ (Food) असेल तर ती खीर. पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी तुम्ही स्वादिष्ट अशी नारळाच्या (Coconut) दुधातली तांदळाची खीर बनवू शकता. कमी साहित्यात तुम्ही अस्सल केरळी पारंपारिक पायसम अर्थात तांदळाची खीर रेसिपी (Recipes) बनवू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य | Ingredients -

  • आंबेमोहोर तांदूळ ½ कप | Rice ½ Cup

  • साजूक तूप 1 tbsp | Ghee 1 tbsp

  • एक मोठ्या नारळाचे दूध अंदाजे 1 लिटर | Milk of 1 large coconut approx. 1 litre

  • बारीक चिरलेला गूळ / गूळ पावडर ½ ते ¾ कप | Chopped Jaggery or Jaggery pw ½ to ¾ Cup

  • साजूक तूप 3 tbsp | Ghee 3 tbsp

  • ओल्या नारळाचे काप ¼ कप | Fresh Coconut slices ¼ Cup

  • काजू बदाम पिस्ता काप आणि बेदाणे आवडीप्रमाणे | Chopped Cashew , almond and pistachios and raising.

  • वेलचीपूड ¼ tsp | Cardamom pw ¼ tsp

  • केसर 10-12 काड्या | Saffron sticks 10-12 (optional)

2. कृती

  • सर्वप्रथम नारळाचा किस काढून त्याला मिक्सरमध्ये वाटून त्याचे दूध काढा.

  • त्यानंतर तांदूळ भिजत ठेवा. भांड्यात गुळाचे पाक तयार करुन घ्या.

  • नंतर एका भांड्यात तूप गरम करुन त्यात खोबऱ्याचे काप, काजू-बदाम तळून घ्या. भिजवलेले तांदूळ त्याच तूपात भाजून घ्या.

  • त्यात नारळाचे दूध घालून तांदूळ शिजवून घ्या. गुळाचे पाक गाळून त्यात घाला. उकळी आल्यानंतर पुन्हा नारळाचे दूध घाला.

  • वरुन तळलेले काजू-बदामाचे आणि खोबऱ्याचे काप घाला. वेलचीपूड केसर घालून सर्व्ह करा.

  • तयार होईल गरमागरम नारळाच्या दुधातली तांदळाची खीर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT