कोमल दामुद्रे
हिवाळ्यात अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.
वातावरणातील बदलांमुळे आपल्या केसांसोबत आरोग्यावरही परिणाम होतो.
थंडीच्या दिवसात ज्याप्रमाणे डिंक, पौष्टिक लाडू, मेथीचे किंवा जवसाचे लाडू आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
आरोग्यासाठी अळीवाचे लाडूही खूप पौष्टिक आहेत. हिवाळ्यात याचे सेवन केल्याने केसगळती आणि कंबरदुखीवर मात करता येते.
१०० ग्रॅम अळीव, १ वाटी नारळ पाणी, ३ वाटी ओल्या नारळाचा किस, १ वाटी गूळ, ५ ते ६ कापलेले बदाम, ५ ते ६ काजू
एका भांड्यात नारळाच्या पाण्यात अळीव भिजवा. रात्रभर अळीव चांगले भिजू द्या.
सकाळी कढई गॅसवर गरम करायला ठेवून त्यात नारळाचा चव, गूळ, भिजवलेले अळीव, काजू आणि बदाम घाला.
लाडू कसे वळवाल?
१५ मिनिटे हे मिश्रण मंद आचेवर एकजीव होऊ द्या. गार झाल्यानंतर त्याचे एकसारखे लाडू वळवा.
यात असणारे व्हिटॅमिन सी, ए, फायबर आणि प्रोटीन स्नायूच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते.