Hormones  Saam Tv
लाईफस्टाईल

Hormones : हार्मोन्सच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये उद्भवतात अनेक आजार, 'या' नैसर्गिक मार्गांचा अवलंब करा

हार्मोन्सच्या कमतरतेमुळे अभावामुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hormones : महिलांच्या प्रजनन प्रणालीला निरोगी ठेवण्यात तसेच त्यांच्या शरीरात बदल घडवून आणण्यात हार्मोनची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि त्याचे नाव इस्ट्रोजेन आहे. इस्ट्रोजेन अनेक प्रकारचे फायदे निभावते, जसे की हा हार्मोमन्स हृदयाचे कार्य, हाडांचे आरोग्य चांगले ठेवतो. त्याच्या अभावामुळे महिलांना (Women) अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढविण्यासाठी आपण काही नैसर्गिक मार्गांचा अवलंब करू शकता.

इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे उद्भवलेल्या समस्या -

इस्ट्रोजेन हार्मोनच्या कमतरतेमुळे महिलांची त्वचा कोरडी पडू लागते. याशिवाय हाडांची कमजोरी, नैराश्य, चिंता, गरम चमक, योनीत कोरडेपणा आणि एकाग्रता नसणे अशा समस्या सुरू होतात.(Stress)

इस्ट्रोजेनसाठी घरगुती उपचार -

१. काही खाद्यपदार्थ शरीरात इस्ट्रोजेन हार्मोन्स वाढवतात. काही संशोधनानुसार, आपण आपल्या आहारात सोया प्रोटीन, बेरी, बियाणे, धान्य, फळे इत्यादींचा समावेश करू शकता.

२. दररोज व्यायाम करून शरीरात इस्ट्रोजेनची पातळी देखील वाढवता येते. वर्कआऊट करताना लक्षात ठेवा की जास्त थकवा येत नाही. दररोज अर्धा तास चालणे हा देखील एक चांगला पर्याय आहे.

३. शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी योग्य ठेवायची असेल तर वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही सकस आहार आणि जीवनशैलीचे पालन करता.

४. घरातील जबाबदाऱ्यांमध्ये तणाव निर्माण होणारच, पण त्याचे व्यवस्थापन करणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, तणाव नियंत्रणाच्या अभावामुळे रजोनिवृत्तीचा टप्पा लवकर येतो.

५. चांगली आणि गाढ झोप घेतल्याने शरीर आणि मन दोघांचेही आरोग्य चांगले राहते. अशा परिस्थितीत रोज रात्री किमान सात तासांची झोप घ्यायलाच हवी.

६. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीमुळे इस्ट्रोजेनची पातळी वाढू शकते. यामुळे रजोनिवृत्तीचा टप्पा लवकर होत नाही. मात्र, त्यासाठी आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varvarche Vadhu Var: लग्नाआधी एकदा पाहाचं ! लग्नावरचं हलकं फुलकं, प्रभावी नाटक - 'वरवरचे वधू वर'

Chandrabhaga River : पंढरपुरात भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा; चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री, सुरक्षा कर्मचाऱ्याचा गोरखधंदा

GK: रडताना डोळ्यांतून अश्रू का बाहेर पडतात? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

दिवसातून ४ वेळा नारळपाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

SCROLL FOR NEXT