Mall Product Prices End With 99 Saam TV
लाईफस्टाईल

Mall Product Prices End With 99 : मॉलमध्ये वस्तूंच्या किंमती 99, 199, 399 आणि 999 अशा का असतात? वाचा कारण

साम टिव्ही ब्युरो

वैष्णवी राऊत

आपण सुपरमार्केट, मॉल्समध्ये खरेदीसाठी जातो. यावेळी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, शक्यतो याठिकाणी वस्तूंच्या किंमती 99, 199, 399, 999 अशा असतात. पण कधी हा प्रश्न पडला आहे का की, अशाच किंमती का असतात? बरोबर 1 रूपयाच का कमी केला जातो?

तर यामागे मोठी मार्केटींग ट्रीक आहे आणि या मार्केटींग ट्रीकसाठी वापरली जाते, एक सायकॉलॉजिकल फॅक्ट, ज्याला 'प्लॅसिबो इफेक्ट' असं म्हणतात. एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीने सांगायची की तो व्यक्ती सहजपणे ती गोष्ट अंगीकारेल, याला 'प्लॅसिबो इफेक्ट' म्हणतात.

हा 'प्लॅसिबो इफेक्ट' किंमत ठरवताना कसा वापरतात?

जर 100 रूपयांची वस्तू 99 रूपयांना दाखवली तर आपोआप आपल्या मेंदूला ती स्वस्त वाटू लागते. कारण ते पाहताना आकड्यांचा फरक आपल्याला जाणवतो. 100 मध्ये 3 आकडे असतात. तर 99 मध्ये 2 आकडे. आकडे कमी झाले की असं वाटतं 'हे तर स्वस्त आहे'

हा झाला आकड्यांच्या 'नंबरचा' मुद्दा. पण यात 'छोट्या' आकड्यांचा मुद्दा सुद्धा महत्त्वाची भूमिका निभावतो. म्हणजे बघा, आपण किंमत नेहमी डावीकडून उजव्या दिशेने वाचत असतो. अशात 500 ची वस्तू जर 499 ला लावली, तर 5 पेक्षा 4 हा छोटा आकडा आहे. आणि म्हणून आपल्याला ती वस्तू पुन्हा स्वस्त वाटू लागते. अचानक 500 चा आकडा मेंदूला 400 वाटू लागतो. मग 400 च्या पुढे कितीही आकडा असो, 475 असो की 499, सायकॉलॉजीनुसार माणसाच्या मेंदूला 500 पेक्षा ते स्वस्तच वाटतं.

मग प्रश्न पडतो, 1 रूपयाने असं काय मिळत असेल मॉलवाल्यांना?

आपण 99, 399, 999 किंमत असलेल्या वस्तू विकत घेतो. त्यानंतर त्याचं बिल करायला गेलो, की कॅशियर सहज म्हणतो, '1 रूपया सुट्टा नाहीय' आपण विचार करतो, 'एका रूपयाने काय जातंय' आणि तो 1 रूपया सोडतो. पण हाच 1 रूपया मॉलवाल्यांना बक्कळ पैसे देतो. कारण दिवसभरात, महिनाभरात, वर्षाला असे अनेक गिऱ्हाईक मॉलमध्ये येतात. त्यांनी हा 1 रूपया सोडला तर लाखोंनी पैसे जमा होतात. 'थेंबे थेंबे तळे साचे' हे तर तुम्ही ऐकलं असेलच. अगदी तसंच.

शिवाय या पैशांची नोंदही नसते. म्हणून ही मॉलवाल्यांची 'वरची कमाई' होते. आपण 99, 399, 999 किंमतीत वस्तू विकत घेतो आणि पुढे किंमत सांगताना 99 ला 100 सांगतो, 999 ला 1000 सांगतो. एका रूपयाने काय जातंय असं सहज बोलतो. पण खरंतर इथेच आपण मॉलवाल्यांना मालामाल करत असतो. आणि स्वत:चे हक्काचे पैसे जातात ते वेगळं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Congress : माजी आमदाराच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या बैठकीत वाद; पदाधिकाऱ्यांमध्ये झाली झटापट

Bachchu Kadu: दोन महिन्यानंतर हे भाऊ सावत्र होतील; लाडकी बहिणी योजेनेवरून बच्चू कडू यांची कोपरखळी

Pimples Problem: चेहऱ्यावर 'हा' पदार्थ वापल्यास पिंपल्सच्या समस्या होतील दूर....

'Stree 2' Aaj Ki Raat Song: 'स्त्री 2'मध्ये 'आज की रात' गाण्याची निवड का केली? दिग्दर्शकाने केला खुलासा

Marathi News Live Updates: पुणे, रायगड, रत्नागिरीमध्ये रेड अर्लट; पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT