Top 3 nutritious Indian desserts for festivals Freepik/BetterButter
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2025 : हे तीन गोड आणि पौष्टिक पदार्थ घरच्या घरीच बनवा, रक्षाबंधनाचा दिवस होईल खास

Top 3 Nutritious Indian Desserts for Raksha Bandhan : खजूरचे लाडू, नाचणीचा हलवा, बेक्ड सफरचंदाची खीर हे तीन गोड आणि पौष्टिक पदार्थ रक्षाबंधनासाठी घरीच बनवा. स्वादिष्ट, आरोग्यदायी पदार्थ सणाच्या दिवशी खास आनंद देतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावासाठी एक खास दिवस असतो. यावर्षी हा सण ९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहीण तिच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि तिचे रक्षण करण्याचे वचन घेते. तर भाऊ बहीणीकडून चांगल्या आरोग्यासाठी आशिर्वाद घेतो. पण भावाचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी फक्त आशिर्वाद पुरेसा नाही, तर त्याला चांगले पोषण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या भावाला निरोगी आरोग्य द्यायचे असेल. तर अतिप्रमाणात साखर वापरून तयार केलेली मिठाई आणण्यापेक्षा हे पौष्टिक आणि गोड पदार्थ तुम्ही घरीच तयार करू शकता.

खजूर आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू

साहीत्य:

एक वाटी खजूर, दिड वाटी बदाम आणि अखरोड, अर्धी वाटी सुक्या नारळाचा किस आणि एक चमचा वेलची पूड

कृती

१. खजूराच्या बिया काढून घ्या. आणि फूड प्रोसेसरच्या मदतीने एक स्मूद पेस्ट तयार करा.

२. बदाम आणि अखरोड बारीक चिरून घ्या. त्यात चवीनुसार वेलची पुड घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

३. हाताला थोडे तूप लावा जेणेकरून मिश्रण हाताला चिकटणार नाही. छान गोल लाडू तयार करून घ्या. तयार लाडूंना किसलेल्या नारळाचे कोटिंग करा.

बेक्ड सफरचंदाची खीर

साहीत्य:

साल काढलेले व चिरलेले २ मध्यम आकाराचे सफरचंद, २ वाटी दुध, अर्धी वाटी तांदूळ, दालचीनी पूड, वेलची पूड, तूप आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स

कृती:

१. ओवनला १०८ अंश तापमानावर प्रि-हिट करून ठेवा. सफरचंदाच्या तुकड्यांवर थोडे तूप शिंपडा आणि बेकिंग ट्रेवर ठेवून मऊ होईपर्यंत २० ते २५ मिनिटे बेक करून घ्या.

२. एका टोपात दुधात तांदुळ घाला आणि घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.

३. यात बेक केलेले सफरचंदाचे तुकडे घाला. गोडव्यासाठी गुळ किंवा मध घाला. चवीनुसार दालचीनी पूड आणि वेलची पूड घाला. काही मिनिटे मंद आचेवर शिजवा.

४. नंतर वरून ड्रायफ्रूट घालून गरम किंवा थंड सर्व्ह करा.

नाचणीचा हलवा

साहीत्य:

दिड वाटी नाचणीचे पीठ, २ वाटी पाणी, अर्धी वाटी गुळ, तूप, वेलची पूड, बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स

कृती:

१. एका कढईत गरम तूपात नाचणीचे पिठ आणि बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स घालून खमंग भाजून घ्या.

२. भाजताना पीठाच्या गाठी होऊ नये यासाठी थोडे थोडे पाणी घाला आणि चमच्याने ढवळत रहा. जेणेकरून पीठ तळाला लागणार नाही.

३. आता त्यात गुळ आणि वेलची पूड घालून घट्ट होईपर्यंत शिजवा.

४. नंतर वरून बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स घालून गरमारगम सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Special Dish : श्रावण स्पेशल चमचमीत अळूची भाजी, वाचा पारंपरिक रेसिपी

दारू पिऊन लोकलमध्ये चढला, पोलिसाचं महिला प्रवाशांसोबत घाणेरडं कृत्य; अश्लील इशारे करत अंगाला स्पर्श

महापालिकेचा जेसीबी पाहताच संतापाचा स्फोट! संभाजीनगरमध्ये लाठीमार अन् हाणामारी, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Pune Crime: मला माहिती नाही माझ्या पत्नीचं काय झालं, खरपुडीमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार?

Maharashtra Politics: शरद पवारांना अजित पवारांचा दे धक्का; ३ टर्म आमदार असलेला बडा नेता राष्ट्रवादीत जाणार

SCROLL FOR NEXT