Summer dinks benefits, how to make summer drinks, Litchi benefits in Marathi, lychee benefits in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

चीनच्या या आंबट-गोड फळांपासून बनवा समर ड्रिंक

बदलेल्या ऋतूनुसार आपल्याला सतत घाम येऊन तहान लागते अशावेळी काय करायला हवे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळ्यात आंब्याशिवाय इतर कोणत्याही फळांना भाव मिळत नाही परंतु, काही पाणीदार फळांची आपल्या शरीराला आवश्यकता असते. उन्हाळ्यात आपण खाण्यापेक्षा पिण्यावर अधिक भर देतो. (Litchi benefits in Marathi)

हे देखील पहा -

बदलेल्या ऋतूनुसार आपल्याला सतत घाम येऊन तहान लागते. अशावेळी आपण सतत पाणी पित असतो. परंतु, दरवेळी पाणी (Water) प्यावेसे वाटत नाही. उन्हाळ्यात काही थंड पेये पिण्याकडे आपला कल अधिक असतो. आपण उन्हाळ्यात काही वेगवेगळ्या प्रकारची फळे वापरून थंडगार पेय बनवू शकतो. या उन्हाळी फळांपैकी आंबट-गोड फळ (Fruit) लिची. ज्याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. सहसा, आपण उन्हाळ्यात लिची चवीने खातो परंतु, त्यापासून अनेक भिन्न चवीचे उन्हाळी पेय बनवता येतात. तर आपण अशाच काही लिची समर ड्रिंक्सबद्दल जाणून घेणार आहोत (How to make summer drinks)

लिची-सबजा ड्रिंक

लिची आणि सबजाच्या मदतीने आपण एक उत्तम उन्हाळी पेय बनवू शकतो.

साहित्य-

किसलेल आलं -१ छोटा चमचा

लिंबाचा रस - १ चमचा

लिचीचा रस - १ ग्लास

द्राक्षे - १ कप

सबजा - १ कप

पुदिन्याची पाने, मीठ, बर्फाचे तुकडे आवश्यकतेनुसार

पेय बनवण्याची कृती -

सर्वप्रथम किसलेलं आलं, लिंबाचा रस आणि लिचीचा रस घाला. त्यानंतर त्यात मीठ आणि बर्फाचे तुकडे घालून चांगले एकजीव करा. आता त्यात द्राक्षांचे काही तुकडे आणि सबजा घालून मिक्स करा. नंतर त्यात पुदिन्याची पाने कुस्करून घालून ग्लासमध्ये (Glass) सर्व्ह करा

डिस्क्लेमर: हे पेय फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT