Rose Barfi And Pink Tea Saam Tv
लाईफस्टाईल

Rose Barfi And Pink Tea : पार्टनरला खुश करण्यासाठी बनवा गुलाबाची बर्फी व पिंक टी, पाहा रेसिपी

Food : ही चविष्ट डिश तुम्ही तुमच्या पार्टनरला खायला देऊन इम्प्रेस करू शकता.

कोमल दामुद्रे

Gulabachi Barfi : फेब्रुवारीचा महिना हा प्रेमाचा महिना असतो. ज्यामध्ये बरेच लोक आपल्या पार्टनर सोबत फिरायला जातात, त्याचबरोबर अनेक लोकांना आपलं प्रेम व्यक्त करायला भेटत.

आपल्या सगळ्यांनाच प्रेम माहित आहे त्याचबरोबर प्रेमाचा सामना कसा करायचा हे सुद्धा आपल्याला माहित आहे. कुणीतरी म्हणून ठेवला आहे की, प्रेमाच्या हृदयात जाण्याचा मार्ग त्याच्या पोटापासून आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक छान रेसिपी सांगणार आहोत. ही चविष्ट डिश तुम्ही तुमच्या पार्टनरला खायला देऊन इम्प्रेस करू शकता. जाणून घेऊयात गुलाबची बर्फी कशी बनवायची.

1. साहित्य :

  • गुलाबाच्या पाकळ्या एक कप

  • बादाम एक कप

  • नारळ एक कप

  • साखर (Sugar) अर्धा कप

  • पाणी (Water) अर्धा कप

  • शुद्ध तूप एक चमचा

Rose Barfi

2. कृती :

  • गुलाबाची बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी गुलाबाच्या पाकळ्या वेगवेगळ्या करा.

  • त्यानंतर थोड्या वेळ गुलाबाच्या पाकळ्यांना पाण्यामध्ये भिजत ठेवा.

  • सोबतच नारळाला गरम पाण्यामध्ये एक ते दोन तास भिजवत ठेवा.

  • कारण की नारळ मुलायम होईल आणि सहजरीत्या मिक्सरमध्ये पीसून जाईल. अशातच सगळी सामग्री एका बाऊलमध्ये काढून कापून घ्या.

  • त्यानंतर खव्याला स्मॅश करा. त्यानंतर नारळाला आणि पाकळ्यांना मिक्सरमध्ये टाकून भरड करून घ्या. आता गॅस वरती एक पॅन ठेवा आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम तूप टाका.

  • तूप चांगलं गरम झाल्यावर मेवा हलका ब्राऊन करून घ्या. त्यानंतर मेवा काढून घ्या. नंतर वेलची, नारळ, साखर, खवा घालून ब्राऊन होईपर्यंत परता.

  • पाच ते दहा मिनिटं साखर चांगली मिसळली की एका प्लेटमध्ये काढून घ्या.

  • प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर वरून बदामाचे काप घालून बर्फीच्या आकाराचे तुकडे थंड झाल्यावर कापून घ्या. तुमची नारळाची गुलाब बर्फी तयार झाली.

  • आता तुम्ही तुमच्या पार्टनरला खायला द्या. तुमचा पार्टनर इम्प्रेस होईल.

3. पिंक टी सामग्री

  • पाणी आठशे मिली

  • लवंग अर्धा टीस्पून

  • दूध (Milk) 300 मिली

  • वेलची तीन

  • दीड टेबलस्पून साखर

  • एक टेबल स्पून पिस्ता

  • एक टेबल स्पून ग्रीन टी

  • एक चक्रफळ

  • एक चतुर्थांश बेकिंग सोडा

  • दोन केसर

  • दोन बादाम

  • गुलाबी रंगाची मुठभर

Pink Tea

4. बनवण्याची पद्धत :

  • पिंक चहा बनवण्यासाठी सर्वात आधी एक पण घ्या. त्यामध्ये पाणी टाका.

  • नंतर वेलची, लवंग, ग्रीन टी टाकून घ्या. आता या सगळ्या सामग्रीना चांगल्या पद्धतीने कळवण घ्या आणि गॅस ऑन करा.

  • जेव्हा थोडासा शिजेल तेव्हा बेकिंग सोडा टाकून चांगल्या प्रकारे मिळवून घ्या. जेव्हा हे चांगल्या पद्धतीने शिजेल तेव्हा गॅस बंद करा आणि मिश्रण साईडला ठेवून द्या.

  • आता दुसरा पण गॅस वरती ठेवून त्यामध्ये दूध साखर घालून एक मिश्रण तयार करून घ्या. जेव्हा मिश्रण घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा.

  • आता सर्व करण्यासाठी ग्लास किंवा कप घ्या. आता अर्धा ग्लास दुधापासून बनवलेले मिश्रण टाका आणि आधी बनवलेली चहा मिक्स करा.

  • आता पिंक चहाच्या वरती आईस क्यूब आणि पिस्ता टाकून गरमागरम सर्व करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे आघाडीवर

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT