Ganpati Special Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Ganpati Special Recipe : कमीत कमी साहित्यापासून बाप्पासाठी बनवा मखाण्याचे मोदक, हेल्दी आणि टेस्टीदेखील !

मखाण्याचे मोदक कसे बनवाल ?

कोमल दामुद्रे

Ganpati Special Recipe : लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन घरोघरी होणार आहे. या दिवसात आपण बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्याचा आवडीच्या काही पदार्थांचा आस्वाद घेणार आहोत. परंतु, आरोग्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यायाला हवे.

आरोग्याच्या (Health) दृष्टीने पाहायला गेले तर आपण मखाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मखाणे शरीराला पचण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी अधिक चांगले आहेत. तसेच उच्च रक्तदाबापासून आराम, हाडे मजबूत करण्यासाठी, शरीरात रक्ताची कमतरता नाहीशी करण्यासाठी व मधुमेहांच्या (Diabetes) रुग्णांसाठी मखाणे खाणे उत्तम ठरेल. चला तर मग जाणून घेऊया युट्यूबच्या घरचा स्वाद पेजवरुन मखाण्याच्या मोदकाची रेसिपी

साहित्य -

मखाणे - ४ कप, १ कप साजूक तूप, १/२ कप डेसिकेटेड कोकोनट, २/३ कप गुळ, १/४ चमचा जायफळ पावडर, १ चमचा वेलदोडे, २०/२५ काजू आणि बादाम, सजवण्यासाठी पिस्त्याचे काप.

Makhanyache Modak

कृती -

प्रथम १ चमचा तुपामध्ये काजू आणि बादाम खरपूस भाजून घ्या. त्यानंतर १/४ कप साजूक तुपात मखाणे कुरकुरीत भाजून घ्या. साहित्य थोडे थंड झाले की, भाजलेले काजू , बदाम, मखाणे आणि वेलदोडे एकत्र मिक्सरला बारीक करून घ्या. आता उरलेले तूप आणि गुळ एकत्र गरम करून त्यात वाटलेले मखाण्याचे मिश्रण घाला. सर्व साहित्य चांगले एकजीव झाले की, गॅस बंद करावा. ( संपूर्ण कृती ही मंद गॅसवरच करावी. )मिश्रण थोडे थंड झाले की यात जायफळ खिसून घालावे आणि एकजीव करावे. आता मोदकाच्या साच्यात पिस्त्याचे काप रचावे आणि तयार मखाण्याचे मिश्रण भरून मोदक तयार करावे. हे मोदक २० दिवस आरामात टिकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT