How To Make Makeup Remover Wipes
How To Make Makeup Remover Wipes  Saam Tv
लाईफस्टाईल

How To Make Makeup Remover Wipes : घरच्या घरी असा बनवा मेकअप रिमूव्हर वाइप्स, आता कोणत्याच तेलाची गरज नाही !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Make Makeup Remover Wipes : मेकअप करायला प्रत्येक मुलीला आवडते आणि केलेला मेकअप रिमूव्हर करायची वेळ येते तेव्हा डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी डोळ्यांना बराच वेळ घासावे लागते; ज्यामुळे तुमच्या डोळ्यांनाही हानी पोहोचते म्हणून तुमची फार चिडचिड होते आणि त्यात रिमूव्हर संपला असेल तर विचारूच नका. तर आता तुमची चिंता मिटली समजा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय घरी मेकअप रिमूव्हर बनवण्याचा सोपा उपाय.

घरी आय मेकअप रिमूव्हर वाइप्स कसे बनवायचे -

रोझ वॉटर रिमूव्हर वाइप्स -

यासाठी अर्धा कप गुलाब जल,अर्धा चमचा बदाम तेल (Oil) आणि 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा. मग हे मेकअप रिमूव्हर एका छोट्या बॉक्समध्ये भरून साठवा. यामुळे तुमच्या डोळ्यांचा मेकअप सहज स्वच्छ होतो आणि तुमच्या डोळ्यांना कसला त्रास सुद्धा होत नाही.

जोजोबा ऑइल रिमूव्हर वाइप्स -

जोजोबा तेलाला नैसर्गिक (Nature) मेकअप रिमूव्हर म्हणूनही ओळखले जाते. विशेषत: डोळ्यांचा मेकअप स्वच्छ करण्यासाठी हे सर्वोत्तम आहे. यासाठी एका बाटलीत थोडे गुलाबजल आणि जोजोबा तेल मिसळा. त्यानंतर तुम्ही डोळ्यांचा मेकअप काढा.

कोरफड -

कोरफडीचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. आपण ते मेकअप रिमूव्हर म्हणून देखील वापरू शकता. यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये कोरफड पाणी मिसळा. हे त्वचेतील घाण काढून टाकते.

मध -

आपण मध आणि बेकिंग सोडा एकत्र मिसळू शकता आणि मेकअप रिमूव्हर म्हणून वापरू शकता. हे संयोजन तुमच्या त्वचेसाठी उत्तम क्लीन्झर आणि एक्सफोलिएटर म्हणून काम करते.

कच्चे दुध -

मेकअप काढण्यासाठी कच्च्या थंड दुधाचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी, तुम्ही एका छोट्या भांड्यात काही कापसाचे गोळे दुधात बुडवून या कॉटन बॉलच्या मदतीने त्वचेवरील मेकअप उत्पादने काढून टाकू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT