Low fat snacks ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

भूक लागल्यावर असा बनवा लो फॅट स्नॅक्स

भूक लागल्यानंतर आपण तळलेले पदार्थ खातो. त्यामुळे आपल्या वजनात अधिक भर पडते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या काम करताना किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागते त्यावेळी आपल्याला नाश्ता करावासा वाटतो.

हे देखील पहा -

भूक लागल्यानंतर आपण तळलेले पदार्थ खातो. त्यामुळे आपल्या वजनात अधिक भर पडते. बाहेरचे पदार्थ किंवा आपण जंक फूड खाण्यास प्राधान्य देतो. जर तेलकट किंवा तळलेले अन्न मधल्या जेवणात खाल्ले तर त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढतेच पण इतर अनेक समस्या निर्माण होतात. भूक लागल्यावर आपण लो फॅट असणाऱ्या स्नॅक्स खायला हवे. ज्यामुळे आपले पोटही भरलेले राहिल व कॅलरीज वाढणार नाही. ते बनवायचे कसे हे पाहूया

मटकी-काबुली चणा चाट

मटकीत जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे असल्यामुळे आपल्या केसांना (Hair) आणि त्वचेसाठी (Skin) ते अधिक फायदेशीर असतात. त्याचे सेवन केल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

साहित्य-

मटकी - १ वाटी

काबुली चना - २ मोठे चमचे

उकडलेले बटाटे- ३

काकडी- १

टोमॅटो - २

कांदे- २

हिरव्या मिरच्या - ३

लिंबू - २

मीठ, मिरची पावडर व चाट मसाला आवश्यकतेनुसार

कृती -

१. सर्वप्रथम आपण मटकी व काबुली चणे यांना भिजत घालून मोड आणा.

२. आता मोड आलेली मटकी व काबुली चणे यांना उकडवून घ्या.

३. चाट तयार करण्यासाठी उकडलेले बटाटे कापून, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, कांदे यांचे छोटे तुकडे करून मिक्स करा.

४. त्यात उकडवलेली मटकी व काबुली चणे घालून मिश्रण चांगले एकजीव करा.

५. चवीनुसार मीठ, चाट मसाला, लाल तिखट व लिंबाचा रस पिळून घ्या.

६. आपल्या आवडीनुसार आपण त्यात मसालेही घालू शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या नृत्यावरून नवा वाद! भाजप नगरसेविकेची थेट पोलिसांत तक्रार

Mustard Oil vs Sunflower Oil: मोहरीचे तेल की सूर्यफूल तेल? स्वयंपाकासाठी कोणते तेल अधिक फायदेशीर, जाणून घ्या दोघांमधील फरक आणि फायदे

Maharashtra News Live Update: वाशिमच्या बोरगाव येथे गॅस सिलिंडरचा स्फोट, ४ घरं जळून खाक

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज सर्वात मोठा बदल, खरेदी करण्यापूर्वी वाचा 18-22 आणि 24 कॅरेटचे दर

राहुल गांधींना हायकोर्टाचा जोरदार झटका; मोदींबद्दल टिप्पणी केल्याप्रकरणी मानहानीची तक्रार रद्द करण्यास नकार

SCROLL FOR NEXT