Chocolate Oats Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Chocolate Oats Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा चॉकलेट ओट्स, पाहा रेसिपी

Recipe : भूक भागवण्यासाठी आरोग्यदायी पदार्थ खाण्यासाठी फारच कमी पर्याय उपलब्ध आहेत.

कोमल दामुद्रे

Evening Breakfast Ideas : दुपारच्या लंच नंतरही संध्याकाळी थोडीफार तरी भूक लागतेच. त्यामुळे ही भूक भागवण्यासाठी आरोग्यदायी पदार्थ खाण्यासाठी फारच कमी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे चॉकलेटचा वापर करून घरच्या घरी बनवा हेल्दी नाश्ता.

जर तुमच्याकडे सकाळचा नाश्ता बनवण्यासाठी वेळ नाही तर तुम्हाला केवळ ही रेसिपी रात्री बनवून रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा आरोग्यदायी (Healthy), स्वादिष्ट नाश्ता तयार असेल. बदामाचे दूध (Milk), ओट्स, केळी (Banana), कोको पावडर, मध यापासून बनवलेले ही गोड रेसिपी नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

1. चॉकलेट ओट्ससाठी लागणारी सामग्री

  • 2 केळी

  • 1 कप बदामाचे दूध

  • 1 टीस्पून चिया सीड्स

  • 1 कप रोल केलेले ओट्स

  • 2 टीस्पून गोड नसलेले कोको पावडर

  • 3 चमचे मध

2. पद्धत

  • स्टेप 1 - एका भांड्यात केळी बारीक चिरून ठेवा आणि केळी चांगल्या मॅश करून पेस्ट तयार करून घ्या.

  • स्टेप 2 - आता त्याच भांड्यात ओट्स, बदामाचे दूध, मध, चिया सीड्स आणि कोको पावडर घालून मिश्रण छान एकजीव करून घ्या. त्यानंतर हे तयार मिश्रण दोन वेगळ्या भांड्यामध्ये समान प्रमाणात काढा.

  • स्टेप 3 - हे तयार केलेले मिश्रण 5/6 तास किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा आणि त्यानंतर खा.

  • स्टेप 4 - केळी, शेव्हड चॉकलेटने गार्निश करा आणि स्वादिष्ट नाश्ता सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT