Recipe, Food tips, snacks ideas
Recipe, Food tips, snacks ideas ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Recipe : फक्त रुपयात बनवा बेसनापासून स्वादिष्ट स्नॅक्स, जाणून घ्या रेसिपी

कोमल दामुद्रे

मुंबई : प्रत्येक भारतीय घरात चहा किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यावर चटपटीत पदार्थ खाल्ले जातात. परंतु, नेहमी भजी, चिप्स, कुरकुरे खाणे शरीरासाठी चांगले नसते. तेलाचे पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला देखील हानी पोहोचते.

हे देखील पहा -

चहा सोबत आपल्याला स्नॅक्स खायची इच्छा असेल तर आपण फक्त काही पैशात घरच्या घरी स्नॅक्स बनवू शकतो. आज आपण असे काही स्नॅक्स बनवणार आहोत ज्यामुळे चहा सोबत त्याची लज्जत आणखी वाढलेल.

१. बेसनाची शेव -

साहित्य - १ कप- बेसन, १/४ वाटी तांदळाचे पीठ, १ छोटा चमचा - चाट मसाला, लाल तिखट - १ छोटा चमचा , मीठ - चवीनुसार, ३- हिरव्या मिरच्या, १ इंच - आले, तळण्यासाठी तेल (Oil)

कृती - प्रथम एका भांड्यात बेसन घेऊन त्यात तांदळाचे पीठ, लाल तिखट व इतर सर्व साहित्य घालून चांगले मिक्स करा.नंतर त्यात हळूहळू पाणी (Water) घालून घट्ट पीठ तयार करा. तसेच शेव बनवण्यासाठी शेवच्या साच्यात तेल घालून तयार पीठ घाला. आता कढईत तेल गरम करून मिश्रण हळूहळू साच्यात ओता आणि शेव चांगले तळून घ्या. तयार होईल बेसन शेव.

२. बेसनाची चकली

साहित्य - ४ कप- बेसन, १ कप- तांदळाचे पीठ, २ छोटे चमचे- ओवा, २ ते ३ छोटे चमचे - तीळ, १ चमचा - लाल मिरची पावडर, १ चमचा - हळद, १ चमचा- जिरे पावडर, चवीनुसार - मीठ, तळण्यासाठी तेल

कृती - चकली बनवण्यासाठी एक वाटी बेसनाचे पीठ घ्या. नंतर त्यात तांदळाचे पीठ, लाल तिखट, हिंग, तीळ आणि थोडे तेल घालून चकलीचे पीठ मळून घ्या. चकलीच्या साच्याला तेलाने ग्रीस करा. नंतर कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर चकलीच्या साच्यात मिश्रण टाकून चकली तळून घ्या. सर्व चकल्या हलक्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teacher Fight Video: शाळेत तुफान राडा; शिक्षिका आणि मुख्यध्यापिकेमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Bhandara Forest : शिकारीच्या तयारीत असलेला शिकारी वन विभागाच्या ताब्यात; घरातून अस्वलाचे दोन नखे केली जप्त

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: १३ जागांवर ठाकरे गट विरुद्ध शिवसेना; १५ ठिकाणी काँग्रेस -भाजप 'सामना', कुठे-कोण आमनेसामने?

SCROLL FOR NEXT