Weight loss : वजन कमी करण्यासाठी तुम्ही अन्नपदार्थ कसे खाता ? जाणून घ्या, अन्नपदार्थ खाण्याची योग्य पध्दत

वजन कमी करण्यासाठी खाण्याची वेळ कशी निश्चित कराल ?
Weight loss tips, Meal time
Weight loss tips, Meal timeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वजन कमी करण्यासाठी आपण कोणते पदार्थ खातो यापेक्षा आपण ते किती वेळा खातो आणि प्रत्येक अन्नपदार्थाचा आपण जेवणात किती वेळा समावेश करणे गरजेचे आहे हे शोधणे आवश्यक आहे.

हे देखील पहा -

बरेच लोक त्यांच्या दैनंदिन आहाराची तीन मोठ्या जेवणांमध्ये विभागणी करतात. त्यात प्रामुख्याने नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण आदी असते. परंतु, सध्या लोक वारंवार लहान प्रमाणात खाण्याकडे अधिक वळत आहे. वजन कमी करण्यासाठी हा पर्याय उत्तम मानला जातो. त्यासाठी जेवणाची योग्य पध्दत कोणती हे जाणून घेऊया.

१. कमी परंतु, सतत खाल्ल्याने आपल्याला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. आपण असे केल्याने अतिरक्त लागलेली भूक टाळण्यास मदत होईल. जर दर तीन तासांनी आपण खायला हवे त्यामुळे आपली चयापचय क्रिया देखील सुधारु शकते. वारंवार खाल्ल्याने आपल्याला जेवणाच्या वेळी कमी भूक लागेल. वारंवार खाल्ल्याने रक्तातील साखर स्थिर राहूव दिवसभरातील ऊर्जा घटत नाही.

Weight loss tips, Meal time
Kids Health Tips : पोटदुखीमुळे मुलं झाली हैराण ? हा आजार आहे की, जंताचा वाढलेला आणखी कोणता नवा प्रकार? जाणून घ्या

२. तज्ज्ञांच्या मते, जेवणाची वारंवारता वाढल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. जे लोक लहान, वारंवार जेवण करतात त्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी दिवसातून तीन वेळा कमी जेवण घेणाऱ्यांपेक्षा चांगली असते.

३. वारंवार खाणे हे सगळ्यांसाठी फायदेशीर नसते. त्याचा फायदा फक्त काही लोकांना होतो. ज्यांना पचनामध्ये समस्या आहे आणि पोट फुगणे, मळमळ किंवा उलट्या होतात अशा लोकांना याचा फायदा होऊ शकतो. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर स्नॅक्सचा समावेश करु नका.

४. वारंवार खाण्यात आपण चहा किंवा कॉफीचे (Coffee) सेवन करणे टाळायला हवे. आपल्या या आहारात पौष्टिक पण कॅलरी असणारे पदार्थ खायला हवे त्यामुळे आपले पोट भरलेले राहिल. तसेच जेवणात आपण अधिक साखर व मीठाचे प्रमाण टाळायला हवे. यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते.

५. निरोगी आहारासाठी, फळे (Fruit), भाज्या, संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ यासारखे नैसर्गिक पदार्थ खाण्यावर लक्ष केंद्रित करा. मांस, अंडी, नट, बिया आणि शेंगा यासारख्या पदार्थांसह प्रथिनेयुक्त आहार घ्या. साखर, ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेले जंक फूड टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com