Chikoo Peels Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Chikoo Peels Recipe : चिकूच्या सालीपासून बनवा चविष्ट असे पदार्थ !

Recipe : तुम्हाला चिकुची साल खाणे बोरिंग वाटत असेल तर, तुम्ही चिकूच्या सालीपासून अनेक पदार्थ बनवू शकता.

कोमल दामुद्रे

Chikoo Peels Recipe : अशी अनेक प्रकारचे फळे आहेत ज्यांची साल न काढता खाल्ली जाऊ शकतात. काही फळांमध्येच नाही तर त्यांच्या सालीमध्ये देखील भरपूर पोषक तत्वे असतात. अशातच तुम्ही किटाणू आणि केमीकलने वैतागले असाल तर, तुम्ही फळं धुवून खाल्ली पाहिजे.

परंतु या फळांच्या सालीला सोलून फेकून देऊ नका. तुम्ही जर असं करत असाल तर तुम्ही स्वतःच फार मोठ नुकसान करत आहात. आता चिकू हे फळ खाण्यासाठी अतीशय चांगले असते. चिकू हे फळ (Fruit) सालीसकट खाल्ले पाहिजे.

अनेक व्यक्ती चिकुच्या सालीला फेकून देतात. त्याचबरोबर तुम्हाला चिकुची साल खाणे बोरिंग वाटत असेल तर, तुम्ही चिकूच्या सालीपासून अनेक पदार्थ बनवू शकता.

1. चिकूच्या सालीपासून बनवा पावडर :

सामग्री :

दोन कप चिकूच्या साली, एक मोठा चमचा कोको पावडर, एक मोठा चमचा ब्राऊन शुगर (Sugar).

Chikoo Peels Powder

विधी :

  • सर्वात आधी चिकूच्या सालीना स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करून घ्या.

  • जेव्हा या साली सुकून जातील तेव्हा सालींना मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करून घ्या आणि ब्राऊन शुगर मिसळवा.

  • या सगळ्या गोष्टींना चांगल बारीक वाटून घेऊन तुम्ही स्टोअर देखील करू शकता.

  • तुम्ही ही पावडर चांगली एक महिना वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही दुधासोबत आणि डिनरनंतर डेजर्ट म्हणून खाऊ शकता.

2. चिकूच्या सालीपासून पासून बनवा बर्फी :

सामग्री :

चार-पाच चिकू पल्प, 100 ग्राम मावा, एक मोठा चमचा चिकूच्या साली, दोन मोठे चमचे किसलेला नारळ, एक कप साखर, एक छोटा चमचा वेलची पूड, एक मोठा चमचा बारीक कापलेला पिस्ता.

Chikoo Barfi

बनवण्याची पद्धत :

  • सर्वप्रथम गॅस वरती पॅन ठेवून चिकू पॅनमध्ये स्मॅश करा.

  • त्यानंतर चिकूच्या साली बारीक वाटून किंवा बारीक तुकड्यांमध्ये कापून पॅनमध्ये परता.

  • त्यानंतर पॅनमध्ये मावा टाकून दोन ते तीन मिनिटे चांगले परतून घ्या.

  • त्यानंतर गॅस बंद करून पॅन खाली उतरवून घ्या.

  • हे सगळे मिश्रण एका ताटामध्ये घेऊन त्यामध्ये किसलेला नारळ, वेलची पूड आणि पिस्ता घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

  • एका ट्रेमध्ये तूप लावून सगळे मिश्रण ट्रेमध्ये ओतून सेट होईपर्यंत ठेवा. त्यानंतर त्यांना चौकोनी आकारात कापून सर्व करा चिकूच्या सालीची बर्फी.

3. चिकूच्या साली पासून बनवा मिल्कशेक :

सामग्री :

एक कप स्मॅश केलेला चिकू, एक मोठा चमचा कोको पावडर, एक कप चिकूची साल, तीन कप दूध (Milk), एक चमचा साखर, सात ते आठ बर्फाचे तुकडे.

Milkshake

बनवण्याची पद्धत :

  • एका मिक्सरमध्ये चिकू आणि ची साली घेऊन त्यामध्ये दूध टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  • आता मिक्सर मध्ये साखर तीन ते चार आईस क्यूब आणि एक छोटा चमचा कोको पावडर टाकून मिक्स करून घ्या.

  • एका सर्विंग ग्लासमध्ये आईस क्यूब घालून मिल्कशेक सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

SCROLL FOR NEXT