Mango Halwa Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Mango Halwa Recipe : आंब्याच्या सिझनमध्ये बनवा चविष्ट असा मँगो हलवा, पाहा रेसिपी

Mango Recipe : पदार्थ बनवतो. उन्हाळ्यातील आंबा हा सर्वात खास असतो. या फळाचा आस्वाद घेण्यासाठी अनेकजण वर्षभर थांबतात.

कोमल दामुद्रे

Summer Season Recipe : उन्हाळा म्हटलं तर आंबा हा बाजारात सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यापासून आपण अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतो. उन्हाळ्यातील आंबा हा सर्वात खास असतो. या फळाचा आस्वाद घेण्यासाठी अनेकजण वर्षभर थांबतात.

आंब्यापासून (Mango) मँगो पापड, मँगो शरबत, मँगो शेक असे अनेक स्वादिष्ट पदार्थही बनवता येतात. आंबा हा फळांचा राजा आहे. ताज्या, रसाळ आंब्यापासून बनवलेला आंब्याचा हलवा तुम्ही कधी घरी करून पाहिला आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी आंब्याच्या हलव्याची रेसिपी (Recipe) घेऊन आलो आहोत. डेझर्ट म्हणून त्याची चव चाखू शकतात.

1. साहित्य

- रवा - 1 1/2 कप

- तूप - 1 कप

- आंब्याचा पल्प - 2 कप

- दूध (Milk) - 1 1/2 कप

- ड्राय फ्रूट्स - 1 कप

- वेलची पावडर - 1/2 टीस्पून

- आंब्याचा रस - 1/2 टीस्पून

2. कृती :

  • आंब्याचा हलवा बनवण्यासाठी प्रथम तवा गॅसवर ठेवा. आता त्यात तूप टाकून गरम करा.

  • तूप गरम झाल्यावर त्यात रवा घालून अधूनमधून ढवळत राहा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. रवा तव्याला चिकटणार नाही हे लक्षात ठेवा.

  • आता कढईत आंब्याचा पल्प आणि दूध घालून चमच्याने हलवून थोडा वेळ शिजवा.

  • सुमारे 7 मिनिटांनंतर, या पुडिंगमध्ये इतर गोष्टी घाला आणि शिजवा. ३ ते ४ मिनिटांनी गॅस बंद करा.

  • आता हा हलवा सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून त्यात केशर, ड्रायफ्रुट्स आणि तूप घालून सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli : थरारक! इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली; दुर्घटनेमध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची गुंडगिरी सुरूच;आधी पत्नीला मारहाण नंतर तरुणाला घासायला लावलं नाक, व्हिडिओ व्हायरल

Astro Tips For Money: पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहात? करा 'हे' उपाय, होईल भरभराट

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का बसणार, नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील इमारत कोसळली तीन जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT