Makar Sankranti 2024 Recipe: Til Gul Halwa Saam tv
लाईफस्टाईल

Makar Sankranti 2024 Recipe: तीळ आणि गुळापासून बनवा चविष्ट गोडाचा पदार्थ, लाडू-चिक्कीसाठी बेस्ट पर्याय; पाहा रेसिपी

कोमल दामुद्रे

Til Gul Recipe :

जानेवारी महिना सुरु झाला की, अनेकांना मकर संक्रांतीचे वेध लागतात. यंदा ही मकर संक्रांती १५ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. या दिवशी तिळाचे आणि गुळाचे पदार्थ खाल्ले जातात.

हिवाळ्यात तीळ आणि गुळाला अधिक महत्त्व आहे. मकर संक्रांतीला गुळाची चिक्की, तिळाचे लाडू आणि तिळ गूळ अशा अनेक पदार्थांची (Food) चव चाखली जाते. जर तुम्ही देखील तेच तेच पदार्थ खाऊन वैतागले असाल तर ट्राय करा तीळ-गुळाचा हलवा. पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • १/२ कप रवा

  • १/२ कप पांढरे तीळ

  • १/२ कप तूप

  • १ मूठभर ड्रायफ्रुट्सचे तुकडे केले

  • चवीनुसार गूळ (Jaggery)

  • चिमूटभर वेलची पावडर

  • आवश्यकतेनुसार पाणी

2. कृती

  • तीळ आणि गुळाचा हलवा बनवण्यासाठी रात्रभर तीळ पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची घट्ट पेस्ट तयार करून घ्या.

  • त्यानंतर कढईत तूप गरम करून त्यात रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

  • त्यात तिळाची पेस्ट घालून मंद आचेवर ढवळत राहा. त्याच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.

  • तिळाचा रंग सोनेरी झाल्यावर त्यात पाणी घाला. आता रवा आणि तिळाची पेस्ट चांगली शिजू द्या.

  • हलवा शिजल्यावर पाणी पूर्ण सुकल्यावर त्यात गूळ, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.

  • हलवा चांगला शिजला आणि कढईतून वेगळा होऊ लागला की, गॅस बंद करून सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT