Early signs of liver damage on skin saam tv
लाईफस्टाईल

Liver failure skin symptoms: तुमच्या त्वचेवर 'हे' 5 मोठे बदल दिसले तर समजा लिव्हर होतंय खराब; वेळीच व्हा सावधान

Early signs of liver damage on skin: यकृत हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. हा अवयव रक्त शुद्ध करण्यापासून ते पचनापर्यंत अनेक महत्त्वाची कार्ये करतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • लिव्हर खराब झाल्याचे संकेत त्वचेवर दिसतात

  • कावीळमुळे त्वचा आणि डोळे पिवळे पडतात

  • पुरळ नसतानाही सतत खाज येते

आपल्या शरीरातील लिव्हर हा एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. हा अवयव बिलिरुबिनसारखं रंगद्रव्य, हार्मोन्स आणि रक्ताच्या गाठी बनवण्यासाठी आवश्यक असणारं क्लॉटिंग फॅक्टर्सचं काम करतं. मुळात ज्यावेळी लिव्हर नीट काम करणं थांबवतं त्यावेळी तेव्हा शरीरात या घटकांचं संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम त्वचा, रक्तवाहिन्या आणि रक्तस्त्रावाच्या पद्धतींवर दिसू लागतो.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, बाहेरून दिसणारे संकेत अनेकदा आतल्या गंभीर लक्षणांआधीच दिसायला सुरुवात होतात. कोणत्याही आजारांचे संकेत आपल्याला मिळत असतात. त्यामुळे लिव्हर बिघडण्याची प्रारंभिक चिन्हं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे.

कावीळ (Jaundice)

ज्यावेळी लिव्हर बिलिरुबिन योग्य प्रकारे साफ करू शकत नाही, तेव्हा हे रक्तात वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्वचा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर पिवळसर छटा दिसायला लागतात. हा पिवळेपणा अनेकदा लिव्हरची गंभीर समस्या दर्शवतो. सुरुवातीला हलका पिवळेपणा दिसतो, पण वेळेत तपासणी न केल्यास तो वाढत जाऊ शकतो.

पुरळ नसतानाही खाज येणं

कधीकधी संपूर्ण शरीरावर सतत खाज येण्याची समस्या जाणवते. मात्र यावेळी त्वचेवर कुठेही पुरळ, लालसरपणा किंवा दिसत नाही. अशी समस्या तेव्हाच जाणवते ज्यावेळी लिव्हर नीट कार्य करत नसल्यामुळे पित्तातील आम्लं (bile acids) रक्तात साचतात. हे आम्लं त्वचेखाली साठल्यामुळे तीव्र खाज सुटते. खाज रात्री जास्त वाढू शकते आणि त्यामुळे झोपेतही व्यत्यय येतो.

स्पायडर अँजायोमा

चेहरा, मान, छाती किंवा हातांवर कोळ्याच्या जाळ्यासारख्या दिसणाऱ्या, मध्यभागी लाल ठिपका आणि त्यातून निघालेल्या बारीक लाल रक्तवाहिन्यांसारख्या रेषा असतात. यांना स्पायडर अँजायोमा म्हणतात. हे लहान असलं तरी ते हळूहळू संख्येने वाढू शकतात. हे विशेषतः यकृताच्या दीर्घकालीन आजारांमध्ये दिसून येतं कारण लिव्हर शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडवतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये बदल होतो.

तळहात लाल होणं

तळहात विशेषतः अंगठ्याच्या जवळील आणि करंगळीच्या जवळील भागांमध्ये लालसरपणा दिसू लागतो, त्याला पामर एरिथेमा म्हणतात. हा लालपणा साधारणपणे जळजळ किंवा वेदना देत नाही, पण तो स्पष्टपणे दिसतो. लिव्हर हार्मोन्सचे नियमन करू शकत नसल्यामुळे रक्तप्रवाह त्वचेच्या वरच्या भागात वाढतो आणि त्यामुळे तळहात लाल होतात.

सहज मार लागणं

लिव्हर रक्ताच्या गाठी बनवण्यासाठी आवश्यक असलेलं क्लॉटिंग फॅक्टर्स तयार करतं. ज्यावेळी लिव्हर कमकुवत होतं त्यावेळी हे घटक नीट तयार होत नाहीत आणि त्यामुळे छोटा मार लागला तरीही मोठा निळसर डाग पडू शकतो. अगदी लहान जखम झाली तरी बराच काळ रक्तस्राव होत राहतो. जास्त वेळ थांबत नाही आणि सतत वाहत राहतं. काही लोकांना नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची तक्रार होते.

लिव्हर खराब झाल्याचे पहिले लक्षण काय?

त्वचा आणि डोळे पिवळे पडणे हे पहिले लक्षण आहे.

खाज येणे लिव्हरशी कसे संबंधित आहे?

पित्ताचे आम्ल रक्तात साचल्यामुळे खाज येते.

स्पायडर अँजायोमा म्हणजे काय?

त्वचेवर कोळ्याच्या जाळ्यासारख्या रक्तवाहिन्या दिसतात.

तळहात लाल का होतात?

लिव्हर हार्मोन्स नियंत्रित करू शकत नाही म्हणून होतात.

लिव्हर खराब असल्यास जखमा का वाढतात?

क्लॉटिंग फॅक्टर्स कमी होतात म्हणून जखमा वाढतात

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT