Maharashtra Din 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Maharashtra Din 2023 : मुंबई-पुण्यालगत असणाऱ्या हिल स्टेशनची परदेशी पर्यटकांनाही भूरळ, यंदाच्या विकेंडला नक्की भेट द्या

Weekend Plan : यंदाच्या विकेंडला व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आपण निर्सगाच्या सान्निध्यात आपण जाऊ शकतो.

कोमल दामुद्रे

Maharashtra Hill Station : महाराष्ट्राला निर्सगाचा वारसा लाभला आहे. या हिरवळीला जगभरातील अनेक पर्यटकांना त्याच आकर्षण देखील आहे. त्यामुळे या हिल स्टेशनला विकेंडच्या दिवशी भारतीयांसोबत विदेशी पर्यटकांची देखील प्रचंड गर्दी पाहायला मिळेल.

यंदाच्या विकेंडला (Weekend) व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधानू आपण निर्सगाच्या सान्निध्यात आपण जाऊ शकतो. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून आपण मोकळ्या वातवरणासाठी नक्कीच या हिल स्टेशनला भेट देऊ शकतो. महाराष्ट्राला भारतातील काही सर्वोत्तम हिल स्टेशन्सचा आशीर्वाद आहे. ही हिल स्टेशन्स त्यांचे धबधबे (Waterfalls), हिरवेगार जंगल, नयनरम्य तलाव आणि सतत धुके असलेल्यामुळे प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील प्लान करत असाल तर यंदाच्या विकेंडला नक्की जा.

1. लोणावळा

Lonavala

पुणे जिल्ह्यात वसलेले लोणावळा मुंबईपासून फक्त ९६ किमी आणि पुणे शहरापासून ६४ किमी अंतरावर आहे. हे सर्वात लोकप्रिय क्विक वीकेंड गेटवेजपैकी एक आहे आणि लोणावळ्यात सुंदर धबधबे, अप्रतिम ट्रेकिंग ट्रेल्स, खडकांच्या गुहा आणि हिरवीगार हिरवळ आहे.

2. माथेरान

matheran

माथेरान हे पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेले आहे, माथेरान हे अतिशय शांत ठिकाण आहे. माथेरान हे मुंबईपासून अवघ्या 110 किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्याने भरलेले एक छोटेसे हिल स्टेशन आहे . हे पश्चिम घाट पर्वत रांगेत समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर वसलेले आहे. त्याचे मुंबई आणि पुण्यापासूनचे अंतर अनुक्रमे 90 आणि 120 किमी आहे. प्रमुख शहरांच्या जवळ असल्यामुळे, माथेरान हे शहरवासीयांसाठी एक लोकप्रिय वीकेंड डेस्टिनेशन आहे.

3. इगतपुरी

Igatpuri

इगतपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक शहर आहे . हे एक हिल रिसॉर्ट आणि नगर परिषद आहे. हे पश्चिम घाटावर वसलेले आहे . इगतपुरी रेल्वे स्थानक मुंबई आणि नाशिक रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान वसलेले आहे . रस्त्याने, हे व्यस्त राष्ट्रीय महामार्ग 160 द्वारे मुंबईपासून 130 किमी आणि नाशिकपासून 45 किमी अंतरावर आहे . इगतपुरीची सरासरी उंची ५८६ मीटर आहे

4. महाबळेश्वर

Mahabaleshwar

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. हे आतिशय थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे.

5. खंडाळा

Khandala

खंडाळा हे भोर घाटाच्या माथ्यावर वसलेले आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात नैसर्गिकरित्या समृद्ध ठिकाणांपैकी एक आहे. सह्याद्री पर्वतरांगा उत्कृष्ट दृश्यांसह उत्कृष्ट ट्रेकिंग ट्रेल्स देते. राजमाची पॉइंट, सनसेट पॉइंट, कुणे धबधबा, ताम्हिणी घाट, भाजा आणि कार्ला लेणी आणि भुशी तलाव ही खंडाळ्यातील आणि आसपासची काही लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत.

5. पाचगणी

Pachgani

पाचगणी हे पाच निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेले आहे आणि त्यामुळे सुंदर ठिकाणांची कमतरता नाही. धबधबे असो की दऱ्या किंवा जंगले, पाचगणीला ते सर्व लाभले आहे.

6. भंडारदरा

Bhandardara

भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे. भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT