Dr. Babasaheb Ambedkar  Saam Tv
लाईफस्टाईल

Dr. Babasaheb Ambedkar : आज महापरिनिर्वाण दिन! जाणून घेऊया बाबासाहेबांचे अनमोल विचार

Mahaparinirvan Din 2023 : बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केले जाते.

कोमल दामुद्रे

Dr. Babasaheb Ambedkar Thoughts :

६ डिसेंबर रोजी संविधानाचे जनक डॉ.बी.आर. आंबेडकर यांची पुण्यतिथी असते. त्यांचा पुण्यतिथीनिमित्त देशभरात महापरिनिर्वाण दिनी अभिवादन केले जाते. संविधान निर्माते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते.

बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आणि 14 एप्रिल रोजी भारतात (India) आंबेडकर जयंती असते. या दिनी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे, कर्तृत्वाचे स्मरण केले जाते. दलित समाजासाठी त्यांनी मोठे योगदान दिले त्यासाठी बाबसाहेब हे त्यांच्यासाठी देवापेक्षा कमी नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी आणि गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. यादिनानिमित्त जाणून घेऊया बाबासाहेबाचे काही अनमोल विचार जे आयुष्यात यशस्वी (Success) बनवतील.

  • स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा !

  • शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!

  • बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

  • मला स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.

  • माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.

  • अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे.

  • तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.

  • स्त्रियांनी जी प्रगती केली आहे तिच्या पदवीनुसार मी त्यानुसार समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो.

  • तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.

  • सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

  • आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?

  • इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.

  • मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे.

  • देवावर अवलंबून राहू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT