lung cancer India stats google
लाईफस्टाईल

Lung Cancer : धूम्रपान न करणाऱ्यांनाही होतो फुफ्फुसाचा कर्करोग; २५% रुग्णांची धक्कादायक माहिती समोर

Non Smoker Cancer : फुफ्फुसाचा कर्करोग फक्त धूम्रपान करणाऱ्यांपुरता मर्यादित नाही. भारतात २५-४०% रुग्ण कधीही धूम्रपान न करणारे असून, वायू प्रदूषण व हार्मोन्स ही प्रमुख कारणं आहेत.

Sakshi Sunil Jadhav

फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे धूम्रपान करणाऱ्यांचीच समस्या, हा समज आता चुकीचा ठरत आहे. सध्या भारतात आणि संपूर्ण जगभरात फुफ्फुसाच्या कर्करोगाची वाढती प्रकरणं पाहता, धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही या आजार मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय हे समोर आले आहे. संशोधनानुसार, भारतातील १० ते ३० टक्के फुफ्फुसाच्या कर्करोग रुग्णांनी कधीही धूम्रपान केलेले नाही. काही भारतीय अभ्यास तर हा आकडा ४० टक्क्यांवर पोहोचल्याचे दर्शवतात.

कर्करोगाची धक्कादायक आकडेवारी

घरगुती वायू प्रदूषण, कोळसा किंवा लाकूड जाळल्यामुळे निर्माण होणारे कार्सिनोजेन्स, व्यावसायिक प्रदूषण, दुसऱ्या हाताने श्वासावाटे घेतला जाणारा धूर, तसेच आधीपासून अस्तित्वात असलेले फुफ्फुसाचे आजार. महिलांमध्ये विशेषतः हार्मोनल बदल, इस्ट्रोजेनसारख्या घटकांमुळे कर्करोगाच्या पेशींना चालना मिळते, असे डॉक्टर राधेश्याम नाईक यांनी स्पष्ट केले.

लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनात असंही नमूद केलं आहे की २०२२ मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित रुग्णांपैकी ५३ ते ७० टक्के लोक हे कधीही धूम्रपान न करणारे होते. त्यात विशेषतः ‘एडेनोकार्सिनोमा’ या प्रकाराचे प्रमाण अधिक होते. हा कर्करोगाचा असा प्रकार आहे जो वायू प्रदूषणामुळे अधिक प्रमाणात आढळतो.

हेच प्रदूषण, विशेषतः PM2.5 सारखे सूक्ष्म कण फुफ्फुसांमध्ये खोलवर जातात आणि पेशींना हानी पोहोचवतात. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. आयएआरसीचे शास्त्रज्ञ फ्रेडी ब्रे यांच्यानुसार, धूम्रपानाच्या बदलत्या सवयी आणि वाढता वायू प्रदूषण यामुळे ही स्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. या समस्येवर उपाय म्हणून सरकारने तंबाखू नियंत्रणासोबतच वायू प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर धोरणे राबवण्याची गरज आहे.

फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका केवळ धूम्रपान करणाऱ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, हे सत्य आता आरोग्य धोरणांमध्येही प्रतिबिंबित व्हायला हवे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Crime : जालना हादरले; जुन्या वादातून तरुणाची हत्या, आई- वडिलांनाही बेदम मारहाण

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नये?

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

SCROLL FOR NEXT