Numerology SAAM TV
लाईफस्टाईल

Numerology : तुमचं लव्ह मॅरेज होईल की अरेंज? वाचा अंकशास्त्र काय सांगते

Love Marriage or Arrange Prediction : एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनाचा अंदाज आपण अंकशास्त्रानुसार लावू शकतो. चला तर मग आज जाणून घेऊयात तुमचं लव्ह मॅरेज होईल की अरेंज?

Shreya Maskar

प्रेम आणि लग्न आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा एक निर्णय आपले आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरतो. यामुळे हा निर्णय पूर्ण विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. मात्र एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनाचा अंदाज म्हणजे त्या व्यक्तीचे लव्ह मॅरेज होईल की अरेंज मॅरेज? हे आपण ओळखू शकतो. यासाठी अंकशास्त्र जन्मतारखेवरून आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगता येतात.

मूलांक १

१, १०, १९ आणि १८ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक १ असतो. या लोकांना आपले प्रेम व्यक्त करायला जमत नाही. यांचा स्वभाव लाजाळू असतो. त्यामुळे या लोकांचा प्रेमविवाह होण्याची शक्यता कमी असते.

मूलांक २

२, ११ आणि २० तारखेला जन्मलेले लोकांचा मूलांक २ असतो. हे प्रेमाच्या बाबत खूप हळवे असतात. याचा प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त असते. तसेच ही लोक आपल्या जोडीदारावर जीवापाड प्रेम करून नातं शेवटपर्यंत टिकवतात.

मूलांक ३

कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेले लोकांचा मूलांक ३ असतो. यांचा स्वभाव रोखठोक असतो. यांना एखादी व्यक्ती आवडली तर ते नक्कीच प्रेमविवाहाचा विचार करतात.

मूलांक ४

मूलांक ४ चा ग्रह राहू असतो. त्यामुळे ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेल्या लोक लव्ह मॅरेज करतात. मात्र यांच लव्ह खूप गुंतागुंतीचे असते. यामुळे यांच्या एकनिष्ठेबाबत शंका उपस्थित होते.

मूलांक ५

५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेले लोक अरेंज मॅरेज करतात. त्यांना प्रेम करणे खूप कठीण जाते. अशी लोक खूप धार्मिक स्वभावाचे असतात. आपल्या कुटुंबाचा ते सर्वात आधी विचार करतात.

मूलांक ६

कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेल्या लोक प्रेमाच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. अशी लोक मनात आलेली गोष्ट पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. याचा प्रेमविवाह यशस्वी होतो.

मूलांक ७

७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेले लोकांना प्रेम भावनेत जास्त रस नसतो. तसेच या जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक ७ असतो. लग्नाशी संबंधित निर्णय घेताना नेहमी त्यांचा गोंधळल उडणार. यांच्या कुंडलीत केतू ग्रह प्रभावी असतो.

मूलांक ८

मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनी असतो. या मूलांकाचे लोक खूप निष्ठावान असतात. ते आपला शब्द नेहमी पाळतात. मात्र ते प्रेमापासून चार हात लांब राहतात. त्यांना लव्ह मॅरेजवर विश्वास नाही. लोकांच्या नात्यांमुळे त्यांचा प्रेमावरून विश्वास उडाला आहे.

मूलांक ९

मूलांक ९ चे लोक खूप व्यावहारिक असतात. त्यांच्या आयुष्यात पैसा कमावणे हेच मोठे उद्दिष्टं असत. त्यामुळे अशी लोक प्रेम विवाह करत नाहीत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माटुंगा रेल्वे कारशेड मध्ये रेल्वे डब्याला भिषण आग

Rice Cooking Tips: भात चिकट होऊ नये म्हणून काय करायचं? वाचा एकदम सोपी ट्रिक

Shocking: क्रिकेटच्या मैदानात रक्तरंजित थरार, रन आऊट दिल्याने अंपायरची चाकूने भोसकून हत्या

Air India CEO Resigns: एअर इंडियाच्या CEO चा तडकाफडकी राजीनामा, कोण संभाळणार टाटा ग्रुप एयरलाइनची कमान?

Coriander Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या 'या' दाण्यांचे पाणी, पोटाची चरबी होईल झपाट्याने कमी

SCROLL FOR NEXT